• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे महारक्तदान शिबिर

by Manoj Bavdhankar
April 10, 2025
in Guhagar
70 0
0
Blood Donation Camp by Aniruddha Upasana Kendra
137
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आयुर्वेदात रक्तमोक्षणाचे महत्त्व, रक्तदान करुन स्वास्थ राखा

गुहागर, ता. 10 : अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागरतर्फे गुहागरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर साई मंदिर, कुलस्वामिनी चौक येथे  दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 2 या वेळेत होणार आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपण रक्तदान करावे. असे आवाहन गुहागरमधील साधकांनी केले आहे.  या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गुहागरमधील साधकांबरोबरच श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक आणि दिलासा मेडिकल ट्रस्ट रिहॅबिलिटेशन सेंटरचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. Blood Donation Camp by Aniruddha Upasana Kendra

अनिरुद्ध उपासना फाउंडेशन १९९९ साला पासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त युनिट रक्तदान करून लाखो व्यक्तींचा जीव वाचवला आहे. रक्तदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. आपण दिलेल्या एका ब्लड बॅग मधून आपण कोणा गरजू व्यक्तीला रक्त देऊन चांगले पुण्याचे काम करतो. आपण दिलेल्या एका ब्लड बॅग मधून  गरजु व्यक्तींना रक्ताबरोबरच प्लेटलेट, प्लाझ्मा असे अत्यावश्यक घटक दिले जातात.  विज्ञानाने प्रगती केलेली असूनही आपल्या रक्तामध्ये असणारे वेगवेगळे घटक स्वतंत्रपणे कृत्रिमरित्या बनविण्याचा शोध आजही लागलेला नाही. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना, अपघातग्रस्तांना  गरजेच्या वेळी आवश्यक असणारे रक्त रक्तपेढीद्वारे दिले जाते.  Blood Donation Camp by Aniruddha Upasana Kendra

या रक्तपेढीला रक्तदान शिबीरांद्वारे दररोज नव्या रक्तांचा पुरवठा करण्याचे काम हजारो सामाजिक संस्था, व्यक्ती करत असतात. अशा रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभागी होवून एखाद्याचा जीव वाचविण्याचे काम करतो. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणतात.  हे समजून घेवून आपणही  या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागरतर्फे करण्यात आले आहे. Blood Donation Camp by Aniruddha Upasana Kendra

स्वहितासाठी रक्तदान करा

आयुर्वेदात वर्षातून एकदा रक्तमोक्षण करावे, असे सांगितले आहे. रक्त मोक्षण म्हणजे शरिरातील रक्त काढून टाकणे. रक्त मोक्षणामुळे उष्णतेचे विचार कमी होतात, त्वचारोग नियंत्रणात येतो. रक्त मोक्षणामुळे हातापायांची आग होणे, पोटात आग होणे, पित्त वाढल्यामुळे होणारे विकार कमी होतात. आपल्या शरीरातली रक्त निर्मितीची प्रक्रिया शरीरातील रक्त कमी होते तेव्हाच होते. रक्त मोक्षणामुळे ही प्रक्रिया वर्षातून एकदा होते. त्यामुळे शरीरातील रक्तनिर्मिती यंत्रणा कार्यान्वीत राहते.  त्याचबरोबर रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी देखील रक्त मोक्षण उपयोगी पडते. शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया रक्त मोक्षणानंतर वेगाने होते. त्यामुळे शरीरातील अनेक भागांपर्यंत रक्त वेगात पोचते. आयुर्वेदात सांगितलेल्या या फायद्यांचा विचार केला तर, आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी देखील रक्तदान उपयोगी पडते. रक्तदान करणे म्हणजे आयुर्वेदातील रक्तमोक्षणाची क्रिया करणेच आहे. ही क्रिया वर्षातून एकदा करण्यासाठी रक्तदान करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. Blood Donation Camp by Aniruddha Upasana Kendra

Tags: Blood Donation Camp by Aniruddha Upasana KendraGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.