श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळातर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 08 : हातखंबा, डांगेवाडीयेथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता यावर्षी प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. Blood donation camp at Ratnagiri Hatakhamba


रत्नागिरी येथील रेड क्रॉस रक्तपेढी यांच्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले होते. गावातील व आजूबाजूच्या बहुसंख्य लोकांनी सहभाग घेतला. शिबिरामार्फत जनजागृती करुन सर्व दानाहुन श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान हे लोकांना मंडळाच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाने उचललेले हे यशाचे पाऊल कौतुकास्पद आहे, असे उद्गार डॉक्टरांनी व्यक्त केले. Blood donation camp at Ratnagiri Hatakhamba
शिबिराकरिता डॉ. शुभम गिरी, टेक्नीशीयन नाझिया खलिफे, टेक्नीशीयन जय गंधेरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुनिल डांगे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. Blood donation camp at Ratnagiri Hatakhamba