• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काळा गुळ घेऊन जाणारा ट्रक आबलोली येथे पकडला

by Manoj Bavdhankar
April 17, 2024
in Guhagar
287 2
0
Black jaggery truck caught
563
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूर वरून चिपळूणला जाणारा आठ टन काळा गुळाचा ट्रक पकडून वाहतूक करणारा दोघांवर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Black jaggery truck caught

कोल्हापूर वरून थेट चिपळूणला जाण्याऐवजी संगमेश्वर मधून गुहागर तालुक्यात दाखल होणारा काळा गुळाचा हा ट्रक चिपळूणमध्ये विना पावती चोर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वतीने गस्त सुरू आहे अशा मध्येच मंगळवारी पहाटे तीन वाजता गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर आठ टन काळा गुळ वाहतूक करणारा ट्रक गुहागर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रवींद्र आठवले, अमोल गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शन खाली पकडला. Black jaggery truck caught

सदर गुळाची खरेदी पावती दाखवता आली नाही यामुळे गुहागर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन गुहागर पोलीस स्टेशन समोर उभा केला आहे. तसेच या आठ टन गुळाची रुपये 48000 तर ट्रकची रुपये दोन लाख किंमत केली असून हा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची नोंद केली आहे. याप्रकरणी दारूबंदी कायदा कलम 70 अंतर्गत चालक मंजुनाथ मगदूम वय 34 राहणार कर्नाटक आणि त्याचा साथीदार विकास शिवलकर वय 35 रत्नागिरी  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Black jaggery truck caught

Tags: Black jaggery truck caughtGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share225SendTweet141
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.