• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धामणसें हटवाडीत पूल, रस्त्यासाठी ३ कोटी मंजूर

by Guhagar News
March 20, 2023
in Ratnagiri
61 1
0
BJP's development work blast

धामणसें हटवाडी येथे पूल, रस्ता मंजुरीचे पत्र सरपंच अमर रहाटे यांच्याकडे देताना

120
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपचा विकासकामांचा धडाका

रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता पहिले मोठे विकासकाम मंजूर झाले आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते गावाला जोडणारा रस्ता व पूल या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी तब्बल तीन कोटी रूपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाला सुरवात होणार आहे. यामुळे या वाड्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून पावसाळ्यातील गैरसोय दूर होणार आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलांना याचा फायदा होणार आहे, असे सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले. BJP’s development work blast

पूल, रस्ता मंजुरीसाठी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी शिफारस केली होती. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी विकासकामाची मागणी केली होती. त्याला तत्काळ मंजुरी मिळाली. तसेच याकरिता विशेष प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनीही केल्याचे रहाटे म्हणाले. BJP’s development work blast

धामणसें गावात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. ग्रामपंचायत पुन्हा मिळवण्याचे आव्हान  सुपुञ व तालूकासरचिटणिस उमेश कुळकर्णी व सहकाऱ्यांनी पेलले व पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली. त्यावेळी ग्रामस्थांना रखडलेली व नवी विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आता हळुहळू विकासकामे मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे. पूल, रस्ता विकासकामांमुळे वाड्या, गावे जोडली जाणार आहेत. पावसाळ्यात सुमारे पाच महिने लोकांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना अडचणी येत होत्या. आता ही अडचण दूर होणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख विश्वास धनावडे यांनी सांगितले. रस्ता, पुलाची मागणी सरपंचांच्या नेतृत्वाखाली  ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, ऋतुजा कुळकर्णी व रेश्मा डाफळे  केली होती. आता लवकरच पुलाच्या भूमीपूजनासाठी मंत्रीमहोदय येणार असल्याचे सांगण्यात आले. BJP’s development work blast

धामणसें हटवाडी येथे पूल, रस्ता मंजुरीचे पत्र सरपंच अमर रहाटे यांच्याकडे देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, माजी सरपंच अविनाश जोशी, उपसरपंच अनंत जाधव, माजी उपरसरपंच मुकुंद जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक जाधव उपस्थित होते. BJP’s development work blast

Tags: BJP's development work blastGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.