गुहागर, ता. 25 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने भाजप उत्तर रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्री दुर्गा मातेची प्रतिमा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. BJP District President Kedar Sathe felicitation


भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केदार साठे हे प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याजवळ संवाद साधत आहेत. भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांजवळ संवाद साधताना आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाचे जे जे कार्यक्रम येतील ते संघटीतरित्या करून गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी कंबर कसा. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध होऊया. त्यासाठी लागणारी सर्व ताकद वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना दिली जाईल. यापुढे विरोधकांच्या बेताल वक्तव्यांना आक्रमकपणे जशास तसे उत्तर देण्याची हिंमत कार्यकर्त्यांनी दाखवावी. त्यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. BJP District President Kedar Sathe felicitation


यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर, रश्मी पालशेतकर, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल भालेकर, यशवंत बाईत, संतोष जैतापकर, भगवान कदम, जगन्नाथ बागकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, श्रीकांत महाजन, अरूण रहाटे, दिलिप बागकर, दिलिप गोखले, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन रविंद्र अवेरे, उमेश भोसले, शहराध्यक्ष संगम मोरे, श्रद्धा घाडे, ज्योती परचुरे, दिप्ती असगोलकर, वैशाली मावळणकर, नेहा वराडकर, भाग्यलक्ष्मी कानडे, आसीफ दळवी, विजय मसुरकर, मंगेश रांगळे, महेश तोडणकर, अभय भाटकर, संदिप हळदणकर,रूपेश विचारे, संजय मालप, नरेंद्र वराडकर, संतोष सांगळे, विकास मालप, मंदार पालशेतकर आदींसह भाजपा आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. BJP District President Kedar Sathe felicitation