• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ठाकरेंनी टिका करताना वापरलेली भाषा निषेधार्थ

by Mayuresh Patnakar
August 2, 2024
in Guhagar
122 1
0
BJP district convention in Guhagar
239
SHARES
683
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केदार साठे, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही

गुहागर, ता. 02 : उबाठाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींवर खालच्या पातळीवर जावून पराकोटीची टिका केली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या राज्यात पश्चिम बंगालप्रमाणे राजकीय स्थिती आणण्याचा प्रयत्न उद्धवजी करत असले तरी भाजप तसे होऊ देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केले. ते गुहागरमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने आले होते. BJP district convention in Guhagar

गुहागरमध्ये 3 ऑगस्टला भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन भाजपच्या केवळ 380 निमंत्रीत पदाधिकाऱ्यांसाठी आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नितेश राणे या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे गुहागरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. BJP district convention in Guhagar

पत्रकार परिषदेत बोलताना साठे म्हणाले की, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना राबविली जाते. महायुतीच्या सरकारने या शेतकऱ्यांना आणखी रु. 6000 चा सन्मान निधी देण्याचा निर्णय केला आहे. मुख्यमंत्री लाडली बहेना या योजनेला देखील महाराष्ट्रातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बेरोजगार युवकांसाठी देखील लाडका भाऊ योजना वेगळ्याप्रकारे राबविली जात आहे.  यामुळे महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण तयार होत आहे. आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभुमीवर पूण्यात झाले त्याप्रमाणे  राज्यात 78 ठिकाणी अधिवेशने घेण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक तालुका स्तरावर अशाच प्रकारे अधिवेशन आयोजित केली जाणार आहेत. BJP district convention in Guhagar

यावेळी केदार साठे यांनी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निषेध केला. ते म्हणाले की, राजकीय मतभेद असतात. राजकारणाची दिशा सतत बदलत असते. मात्र मी तरी राहीन किंवा तू तरी रहाशील अशी भाषा कोणीच वापरत नाहीत. महाराष्ट्राची प्रगती करणाऱ्या देवेंद्रजींच्या सरकारमध्ये त्यावेळी शिवसेनेचेही अनेक मंत्री होते. याच कामांच्या बळावर युती म्हणून शिवसेनेच्या आमदारही विजयी झाले. मात्र राजकीय मतभेद झाल्यावर संपविण्याची भाषा बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाजप त्यांच्या सर्व वक्तव्यांचा निषेध करते. BJP district convention in Guhagar

महायुतीचा उमेदवार कोण, शिवसेनेकडून मतदारसंघांबाबत केलेली मागणी याबाबत बोलताना या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे आमदार असल्याने इथे महायुती म्हणून कोणीही दावा करु शकतो. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला स्वत:ची ताकद वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा असल्याने ही जागा भाजपचं लढवेल असा निर्णय झाला आहे. भाजपकडून उमेदवार कोण याचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत होईल. BJP district convention in Guhagar

लोकसभेत गुहागर विधानसभा मतदारसंघात 27 हजार 500 मतांनी महायुती मागे आहे. हे वास्तव आम्ही स्विकारले आहे. मात्र विधानसभेत ही स्थिती रहाणार नाही. महायुतीचा उमेदवार या मतदारसंघात विजयी होईल याचा ठाम विश्र्वास आम्हाला आहे. असेही केदार साठे यांनी सांगितले. BJP district convention in Guhagar

Tags: BJPBJP district convention in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUddhav ThackerayUpdates of Guhagarउद्धव ठाकरेगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.