गुहागरमध्ये तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने
गुहागर, ता. 23 : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी युपीएचे उमेवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात प्रचंड मोठी आघाडी घेऊन विजय संपादन केला. त्याबद्दल गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात फटाक्यांची आतिबाजी केली. व पेढे वाटुन विजयाचा जल्लोष साजरा केला. BJP cheers for Murmu in Guhagar
राष्ट्रपतीपदाच्या १५ व्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएने आदिवासी प्रवर्गातील द्रौपदी मुर्मु यांना उमेदवारी देऊन विजयी करुन खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सन्मान केला. अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी व्यक्त केली. यावेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरपंचायत भाजप गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समीर घाणेकर, लक्ष्मी कानडे, गजानन वेल्हाळ, संजय मालप, गणेश भिडे, सौ.गिरीजा भिडे, नरेंद्र वराडकर, अमित जोशी, शार्दुल भावे आदीसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. BJP cheers for Murmu in Guhagar