तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री वेळणेश्वर मंदिरात अभिषेक
गुहागर, ता. 15 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री वेळणेश्वर मंदिरात राज ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी अभिषेक घालण्यात आला. Birthday of Raj Thackeray
यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वेळणेश्वर गण उप तालुकाध्यक्ष संदेश ठाकूर, महिला जिल्हा सचिव अनामिका हळदणकर, पडवे गण उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Birthday of Raj Thackeray