नगरसेवक श्री.अमोल गोयथळे यांचा वाढदिवस; दरवर्षी समाजातील घटकाचा सत्कार व साहित्य स्वरूपात मदत
गुहागर, ता.14 : गुहागर नगरपंचायतीचे प्रभाग 16 चे सक्रिय नगरसेवक श्री. अमोल गोयथळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 15, 16 व 17 मधील शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्री. गोयथळे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरावरील लोक उपस्थित होते. Birthday felicitation for retired employees

नगरसेवक अमोल गोयथळे आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजातील प्रत्येक घटकाचा सत्कार करून किंवा साहित्य स्वरूपात मदत करण्याचे कार्यक्रम घेत असतात. यावेळी प्रभाग 15, 16 व 17 मधील निवृत्त झालेले शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचा सत्कार केला. यामध्ये गुहागर आगार मधून सेवानिवृत्त झालेले विद्याधर गोयथळे, शरद गोयथळे, सुनील गोयथळे, गंगाराम जांगळे, भरत गोयथळे शिक्षक सुभाष घाडे, वसंत डेरे, वीज मंडळातील लाईनमन अनंत धनावडे, मर्चड नेव्ही मधील दिलीप गोयथळे, विद्यालयातील वरिष्ठ लिपिक नंदकुमार पाटील, नामदेव रामाणे, अर्जुन जांगळे, किशोर गोयथळे, विश्वास गोयथळे, वीज महावितरणचे धर्मसिंग पाटील, विजय विखारे आदींचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Birthday felicitation for retired employees

कोरोना काळात काम केलेल्या कोविड योद्धे यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप फळ वाटप प्रभाग 15, 16 व 17 मधील नागरिकांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी कोणताही पक्ष न बघता श्री. गोयथळे धावून गेलेले आहेत. Birthday felicitation for retired employees

नगरसेवक म्हणून काम करताना अमोल गोयथळे यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, चाकरमानी यांना मुंबईतून आणणे, अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवणे या कामासाठी पुढाकार घेतला. Birthday felicitation for retired employees

आपल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना नगरसेवक अमोल गोयथळे म्हणाले, मला जेव्हढे शक्य होईल त्या पद्धतीने माझ्या व इतर प्रभागातील नागरिकांना मदत करण्याचे काम करत राहीन. प्रभागातील विकासकामे करताना सर्वांनी चांगले सहकार्य केले. दोन्ही प्रभागात सेवानिवृत्त झालेले अनेक जण मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत होते. या व्यक्तींची ओळख आताच्या तरुणांना होऊन त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळावे, या चांगल्या उद्देशाने हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले. या पुढील काळात आपल्या सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने या परिसरातील अधिकाधिक कामे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. Birthday felicitation for retired employees

यावेळी नगरसेविका मृणाल गोयथळे, मंगेश पाटील, राकेश गोयथळे, अमरदीप जाधव, गणेश भोसले, योगेश गोयथळे, अमित भोसले, मंदार गोयथळे, संकेत गोयथळे, प्रताप गोयथळे, रिया गोयथळे, अर्वी गोयथळे, सौरभ गोयथळे, साहिल लोखंडे आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. Birthday felicitation for retired employees
