जीवन शिक्षण शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व खाऊचे वाटप
गुहागर, ता. 04 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जीवन शिक्षण शाळा नं.१ मधील २४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व खाऊचे वाटप करण्यात आले. Birthday celebration of MLA Jadhav by Guhagar city


यावेळी माजी नगरसेवक प्रविण रहाटे यांनी प्रस्तावना करताना सर्व उपस्थीतांचे स्वागत करून आ. भास्करशेठ जाधव यांच्या कार्याचा आढावा घेत अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण व मुद्देसुद प्रश्न मांडून जनतेचे प्रश्न सोडविण्यास कसे भाग पाडतात व विकासाला कशी गती देतात, याची थोडक्यात माहिती दिली. जेष्ठ शिवसैनिक श्री. राजेंद्र आरेकर यांनी आ. जाधवांच्या कामाची अनेक उदाहरणे देत संकटाच्या काळात धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे जाधव साहेबांनी कष्ट करून शून्यातून इथपर्यंत पोहचले. त्यांचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. Birthday celebration of MLA Jadhav by Guhagar city


यावेळी माजी नगराध्यक्ष व उप तालुका प्रमुख जयदेव मोरे, शहरप्रमुख सिद्धीविनायक जाधव, महीला शहर प्रमुख सारीका कनगुटकर, निशा कांबळे, माजी नगरसेवक सुधाकर सांगळे, विभाग प्रमुख विलास नार्वेकर, श्री विरेंद्र साळवी, उपविभाग प्रमुख सचिन खरे, समीर कनगुटकर, शाखाप्रमुख कल्पेश बागकर, सुरज सुर्वे, माजी सरपंच सतीश शेटे, आरे सरपंच समीत घाणेकर, जेष्ठ शिवसैनिक प्रभुनाथ देवळेकर, दीगंबर शेटे, पराग मोरे, मंगेश शेटे, बंड्या देवकर, शुभम तौसाळकर, आकाश भोसले, जीवन शिक्षण शाळा नं. १ चे मुख्याध्यापक श्री. वासावे, श्री. धुमाळ, श्री. आवटे, श्री . ढोणे, सौ. स्नेहा जोगळेकर, सौ. झगडे, सौ. बेंडल आदी उपस्थित होते. Birthday celebration of MLA Jadhav by Guhagar city

