गुहागर, ता. 19: तालुक्यातील तरुण उद्योजक लोकनेते स्व सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेचे कार्यकर्ते गौरव विखारे यांनी आपला वाढदिवस अनाथालयात साजरा केला. त्यांनी भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण येथे जाऊन मुलांना भेटवस्तू दिल्या. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. Birthday celebration at the orphanage

गौरव विखारेचा मित्र परिवार मोठा आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व मित्र एकत्र येऊन पुष्पगुच्छ देऊन केक कापून वाढदिवस साजरा करत असत. मात्र यातून पैशांचा व्यर्थ खर्च होत असे. हे पुष्पगुच्छ दुसऱ्या दिवशी केराच्या टोपलीत टाकावे लागतात. त्यामुळे याच पैशातून गौरव विखारे याने आपला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पाच वर्षांपूर्वी बदलली. आपल्या मित्रांना घेऊन तो अनाथालयात लहान मुलांच्या वस्तीगृहात जाऊन तिथे मुलांना खाऊ देऊन हा वाढदिवस साजरा करू लागला. Birthday celebration at the orphanage
यावर्षी गौरव विखारे याने आपल्या वाढदिवसानिमित्त चिपळूण मधील भारतीय समाज सेवा केंद्र येथे भेट दिली. तेथील मुलांना खाऊ फळे आणि विविध वस्तू दिल्या. या सर्व वस्तू भारतीय समाजसेवा केंद्र चिपळूणच्या अधिकारी सौ. सुप्रिया मॅडम यांनी स्वीकारल्या. यावेळी स्व सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, राहुल खातू, प्रणित ढेरे, हर्ष गांगण आदी मित्रपरिवार उपस्थित होता. Birthday celebration at the orphanage
