• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ खाडीत दिसून आली जीवदीप्ती

by Ganesh Dhanawade
December 24, 2022
in Ratnagiri
198 2
0
Bioluminescence

दाभोळ खाडीत आढळून आलेली जीवदीप्ती

389
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातल्या खाडीत पहिल्यांदाच निरीक्षण ; पर्यटनप्रेमी सत्यवान देर्देकर

गुहागर, ता. 24 : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे (Bioluminescence) निरीक्षण प्रथमच कोकणातील दाभोळ खाडीत करण्यात आले. गुहागर तालुक्यातील परचुरी येथील पर्यटन व्यवसायिक व पर्यटन प्रेमी सत्यवान देर्देकर यांनी केले आहे. Bioluminescence

गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करत आहेत. दाभोळ खाडीत केल्या जाणाऱ्या मगर सफरसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. यासाठी विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात. सेलिब्रिटीनी देखील अनेक वेळा येथील पर्यटनाचा आनंद लुटला आहे. गोव्याच्या समुद्रामध्ये जीवदीप्तीचे निरीक्षण केले जाते. कोकणात अशी जीवदीप्ती अनेक वेळा दिसून येते. मात्र, तिचे निरीक्षण होत नाही. Bioluminescence

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

जीवदीप्तिमान सजीवांच्या पेशीत ल्युसिफेरीन वर्गातील रसायने आणि ल्युसिफरेज (विकर) ही रसायने तयार होतात. ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनाशी संयोग घडून आल्यामुळे प्रकाशनिर्मिती होते. या क्रियेत ल्युसिफरेज विकर उत्प्रेरकाची भूमिका बजावते. काही वेळा कॅल्शियमची आयने किंवा एटीपीचे रेणू या क्रियेत भाग घेतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये आढळणारे ल्युसिफेरिन वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडणारा प्रकाश वेगवेगळ्या तरंगलांबीचा, निळसर ते लाल असतो. हा प्रकाश ‘शीत’ प्रकारचा असतो. या अभिक्रियेत मुक्त झालेली ८०% ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. तर उर्वरित सु. २०% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम जातीच्या जीवाणूंच्या वृद्धीमिश्रणातून उत्सर्जित झालेला प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकते. अनेक सागरी प्राणी जसे आंतरदेहगुही, कृमी, मृदुकाय, कंटकचर्मी मासे आणि जीवाणूंमध्ये सहजीवन आढळून येते. हे जीवाणू जीवदीप्तीकारक असतात.  Bioluminescence

जीवदीप्तीचा वापर हे जीव वेगवेगळ्या प्रकारे करून घेतात. उदा., काजव्याचा नर आणि मादी प्रजननासाठी एकत्र येण्यापूर्वी प्रकाश प्रक्षेपित करतात. सागरी वलयी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते. हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येऊन मादीबरोबर प्रणय करतो. नंतर दोघेही पाण्यात प्रजननपेशी सोडतात. काही जीवदीप्तीमान खेकडे मीलनासाठी जोडीदार शोधण्यासाठी जीवदीप्तिचा वापर करतात. Bioluminescence

देर्देकर म्हणाले की,  मी पर्यटकांना दाभोळ खाडीत मगर सफरीचा आस्वाद देतो. दाभोळ खाडीत अश्या प्रकारचे जिवदीप्ती अनेक वेळा दिसून येते. मात्र मच्छिमार यांनी त्याचे कधी निरीक्षण केले नसावे. आमच्या नवीन बोटीचे काम सुरू असताना आर्किटेक्ट रोहन मेंगले यांना परचुरी बंदरावरून ही जी दिसून आली. त्यावेळी त्यांनी मला याची माहिती दिल्यावर मी व माझ्या कुटूंबियांनी या जिवदीप्तीचे निरीक्षण केले अशी माहिती परचुरी येथील पर्यटन व्यवसाईक सत्यवान देर्देकर यांनी दिली. Bioluminescence

Tags: BioluminescenceGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet97
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.