• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्त्याला अचानक पडलेल्या खड्ड्यात अख्खा ट्रक पडला

by Guhagar News
September 21, 2024
in Travel
206 2
0
Big pothole suddenly fell on the road
404
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, ता. 21 : पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता. रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेला आहे. या ट्रकसह दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचे सांगितले जात आहे. Big pothole suddenly fell on the road

ट्रक मागे घेत असताना पेव्हर ब्लॉक खचून ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला. घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे दृश्य तेथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात ज्या ठिकाणी हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक थेट नाल्यात गेला. Big pothole suddenly fell on the road

मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक काही सामान घेऊन समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक खचले आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गाडला गेला. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वचावला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोरखंडाच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र खड्डा खूप खोल असल्याने व ट्रक पुरता अडकल्याने दोरखंडाने बाहेर काढणे, आव्हानात्मक बनले आहे. यामुळे जेसीबी बोलावण्यात आला असून जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतका मोठा खड्डा शहरात यापूर्वी कोठेही पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. Big pothole suddenly fell on the road

Tags: Big pothole suddenly fell on the roadGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet101
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.