रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 03 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात रविवारी सकाळी सायकल रॅली काढली. या रॅलीत सायकलपट्टूंसह लहान मुले, महिला, ज्येष्ठांनीही सहभाग घेतला. Bicycle Rally in Ratnagiri
दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा होतो. यानिमित्त जगभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात. रत्नागिरीत रविवारी सकाळी ७ वाजता भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन मारुती मंदिर येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. नाचणे, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, राम आळी, गाडीतळ, टिळक आळीमार्गे बंदररोड, मांडवी येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. याकरिता आठवड्याला किमान ७५ व महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याचे अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सायकल संस्कृती सुरू व्हावी आणि वृद्धिंगत व्हावी, यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे. Bicycle Rally in Ratnagiri