गुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळीजवळ चिखली गावात, गुहागर विजापूर महामार्गालगत गोविंदा हाईटस् नावाची टाऊनशीप उभी रहाणार आहे. या टाऊनशीपचे भूमिपूजन 10 मे 2024 रोजी होत आहे. निसर्गसौदर्याने बहरलेल्या हिरव्या गार परिसरातील ही टाऊनशीप म्हणजे अत्याधुनिक सुखसोयींनी, सुविधांनीयुक्त असे एक छोटंसं शहरच असणार आहे. Bhumipujan of Govinda Heights


महारेराने मंजूर केलेल्या गोविंदा हाईटस् या गृह प्रकल्पामध्ये 610 ते 629 स्क्वेअर फुटाचे 21 आणि त्यापेक्षा जास्त जागेचे 3 असे एकूण 24 फ्लॅटस् आहेत. त्याचबरोबर दुकानांसाठी 8 गाळेही उपलब्ध आहेत. या इमारतीला लिफ्टची व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर फॅमिली गार्डन, जलतरण तलाव, २४ तास पाणी, वाहनांसाठी छत असलेल्या स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही अशा सुविधांची उपलब्धता विकासकाने केली आहे. Bhumipujan of Govinda Heights
अनेकवेळा मोठ्या प्रकल्पांमध्ये जागा मालक वेगळा आणि विकासक वेगळा अशी स्थिती असते. त्यामुळे प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यानंतर अनेक उणीवा समोर येतात. घरांच्या किंमती वाढतात. ग्राहक म्हणून आपल्याला हवे असलेले बदल होतातच असे नाही. गोविंदा हाईटस् या गृह प्रकल्पाचा जागा मालक आणि विकासक एकच असल्याने हा गृहप्रकल्प गुणवत्तापूर्ण राहील. शिवाय गृहप्रकल्पामधील फ्लॅटसची किंमतही अन्य ठिकाणांपेक्षा तुलनेत कमी असेल. Bhumipujan of Govinda Heights


परंतु यामुळे गुहागर तालुक्यात अनेक वर्ष राहून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना, तालुक्यातील खेड्यापाड्यात जागा जमीन असणाऱ्या परंतु शहराजवळ रहायला येऊ इच्छीणाऱ्या अनेक मंडळींना शृंगारतळी, गुहागर परिसरात सहज जागा उपलब्ध होत नव्हता. मात्र आता गोविंदा हाईटस्मुळे आपल्याच तालुक्यात सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे घर घेण्याची या सर्वांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ 10 मे रोजी सकाळी 10 ते 11 या कालावधीत होणार आहे. या प्रकल्पात आपल्याला संकुल घ्यायचे असेल तर 8552001818 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राहुल शेट्ये यांनी केले आहे. Bhumipujan of Govinda Heights