गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार व माहिमकर घर- पाखाडी यांचेही उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा सोमवार दि. 10 एप्रिल 2023 रोजी पार पडला. Bhoomipujan of Pimpaladevi to Cemetery Road

या कार्यक्रमासाठी नगरसेविका सुजाता बागकर, बांधकाम समिती सभापती वैशाली मालप, नगरसेविका भागडे मॅडम, नगरसेविका रेवाळे मॅडम, नगरसेविका सांगळे मॅडम तसेच गुहागर ग्रामपंचायत माजी सरपंच सतीश शेटे, व माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे तसेच गावातील महिला व ग्रामस्थ हजर होते. Bhoomipujan of Pimpaladevi to Cemetery Road
