गुहागर, ता. 01 : मुंबई गोरेगाव पश्चिम येथील बौध्दजन पंचायत समिती अंतर्गत सर्व शाखा आणि गोरेगांव गट क्र. २७ समन्वय समितीतर्फे नुकताच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा संयुक्यंती महोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नुतन विद्यामंदीर, महाराष्ट्र विद्यालय सभागृह, उन्नत नगर, गोरेगांव पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांस बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भगत आणि माजी कार्याध्यक्ष आदरणीय किशोर मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. Bhim Jayanti celebrations at Goregaon
सदर कार्यक्रमात उपस्थितांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस आणि गोरेगाव गटाचे गटप्रतिनिधी राजेश घाडगे , माजी गटप्रतिनिधी तुळशीराम शिर्के, गोरेगाव विधानसभेचे समन्व्यक आणि जेष्ठ नगरसेवक समीर देसाई, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्षा माधवी राणे (काँग्रेस पार्टी ) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विचारमंचावर असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांनी आपल्या बहुजन समाजासाठी जे प्रचंड असे समाजकार्य केले त्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. आणि महापुरुषांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. Bhim Jayanti celebrations at Goregaon

यावेळी गोरेगावतील बौध्दजन पंचायत समितीच्या शाखा क्र. ५७, २३३, ३२१, ३३१, ३४४, ३५०, ३८५, ४३४, ४८५, ५२०, ६२१, ६३२ या १२ शाखांतील सदस्य, पदाधिकारी, आणि महिला मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरेगाव गट क्र २७ मधील समन्वय समितीचे कार्याध्यक्ष धर्मानंद जाधवजी, उपकार्याध्यक्ष आत्माराम मोहिते, संतोष कदम, जेष्ठ समाजसेवक संदीप लाखन, प्रकाश कांबळे, उत्तम रा. जाधव, तांबे बाबा, बिपीन जाधव, जेष्ठ सल्लागार प्रबोध मोहिते, चिटणीस राहुल सावंत, स्वप्नील मोहिते , सरचिटणीस अनिल हळदे, प्रशांत जाधव, प्रसिद्धी प्रमुख उत्तम जाधव आणि असंख्य सर्व शाखा पदाधिकारी आणि कार्यकर्तागण यांनी आपले योगदान दिले. Bhim Jayanti celebrations at Goregaon
कार्यकामाचे अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन सरचिटणीस शिवाजी मोहिते यांनी केले. कार्यक्रमात कवी गायक संजय गमरे आणि त्यांचा कलामंच यांनी सुंदर बुद्ध -भीम गीतांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. सर्व शाखा पदाधिकारी आणि महिला मंडळाच्या सदस्या यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी कार्यक्रमाची सांगता अल्पोहार आणि आभार प्रदर्शनाने करण्यात आली. Bhim Jayanti celebrations at Goregaon
