• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. भावे यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

by Guhagar News
August 11, 2023
in Ratnagiri
62 1
2
Bhave's visit to Marine Biological Research Centre
122
SHARES
348
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 11 : दिनांक ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून तांत्रिक लेक्चर सेरीज आयोजित करण्यात येते. यावर्षी डॉ. एन. पी. साहू, जॉइन्ट डायरेक्टर, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई आणि डॉ. आर.ए. श्रीपादा, वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय समुद्री संस्था, गोवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. Bhave’s visit to Marine Biological Research Centre

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे होते. मत्स्य महाविद्यालयाची स्थापना आणि सुरुवात १९८१ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या पेठ्कील्ला इमारतीत झाली होती. पुढे १९९३ पासून शिरगाव, रत्नागिरी येथील नवीन इमारत मध्ये स्थलांतरीत झाले. जून महिन्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचा कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. संजय भावे यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रथमच विद्यापीठ अंतर्गत असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे भेट दिली. यावेळी संशोधन केंद्राच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मा. आदरणीय कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि खास मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू महोदय यांनी आपले विद्यापीठ सर्वोच्च स्थानी नेण्याचे आश्वासन दिले. Bhave’s visit to Marine Biological Research Centre

यावेळी केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईचे जॉइन्ट डायरेक्टर डॉ. एन. पी. साहू सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मत्स्यालय आणि संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी संशोधन केंद्राच्या विविध महसूल प्रकल्प आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचा आढावा घेवून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रशंसा केली. सदर कार्यक्रमासाठी संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे आणि डॉ. ए.यु., प्राध्यापक स्टेज वर उपस्थित होते. यानंतर कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांनी संशोधन केंद्राची नवीन तयार होत असलेली ईमारत, गेस्ट हाऊस, स्टाफ क्वार्टर्स यांची पहाणी केली. सदर कार्यक्रम संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे यांचे मार्गदर्शन खाली आयोजित करण्यात आला होता. Bhave’s visit to Marine Biological Research Centre

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करीता डॉ.ए.यु. पागारकर, प्राध्यापक; डॉ. हरीश धमगाये, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे; अभिरक्षक डॉ. संतोष मेतर; वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही.आर.सदावर्ते; वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक श्री. आर.एम. सावर्डेकर; वरिष्ठ लिपिक श्रीमती जाई साळवी; लिपिक श्री सचिन पावस्कर; बोटमन श्री महेश किल्लेकर; तांडेल श्री मंगेश नांदगावकर, श्री दिनेश कुबल; मत्स्यालय यांत्रिक श्री मनीष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री सुहास कांबळे, श्री राजेंद्र कडव, श्री. मुकुंद देऊरकर, श्री सचिन चव्हाण, श्री प्रवीण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम यांनी केले. Bhave’s visit to Marine Biological Research Centre

Tags: Bhave's visit to Marine Biological Research CentreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.