विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ तर उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव
गुहागर, ता. 17 : कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा समिती आयोजित भातगांव प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले होते. दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी नायगाव उमेलमान क्रीडांगण येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. संपूर्ण BPL मध्ये दहा संघांनी भाग घेतला. या सामन्यातील विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ व उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव ठरले आहेत. Bhatgaon Premier League Completed
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई गुहागर शाखा अंतर्गत तवसाळ गट अध्यक्ष श्री अनंत पागडे, भातगावचे नेहमीच युवांला सहकार्य करणारे श्री आमिष दादा कदम व भातगावातील प्रेणास्थान वरिष्ठ मंडळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रथम विजेता संघास चषक व रोख रक्कम 20000 रु. व द्वितीय विजेता संघास चषक व रोख रक्कम 12000 रुपये देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज मुकेश वेले RCC, उत्कृष्ट फलंदाज मुकेश वेले RCC, मालिकाविर मुकेश वेले RCC, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वप्नील मुंडेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. Bhatgaon Premier League Completed
यामध्ये साई जुगाई भातगाव- साई वेले/संतोष वेले, AAA फायटर्स भातगांव- सुरज वेले/ज्ञानेश्वर वेले, रायझिंग स्टार्स भातगांव-देवेंद्र गावडे/नंदु वेले/प्रमोद वरवटकर, गॅलॅक्सी स्टार्स भातगांव-विनोद मुंडेकर/मिलिंद मुंडेकर, किंग ऑफ भातगाव-गणेश मुंडेकर, द फायर्स ऑफ भातगाव-सुधीर डिंगणकर, निल 11 भातगाव-अमिष कदम, पँथर ऑफ भातगाव-सतीश सुवरे राधाकृष्ण, क्रिकेट संघ-संदिप मुंडेकर, श्री समर्थ भातगाव-दिनेश हुमणे या संघांनी सहभाग घेतला होता. भातगावातील खेळाडु यांना स्वतःच्या टीम मधून खेळण्याची संधी मिळायची नाही परंतु BPL च्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध झाली. आणि प्रत्येक खेळाडुने यासंधीचा फायदा घेत मी सुद्धा बॅटिंग बॉलिंग करू शकतो हे दाखवून दिले. Bhatgaon Premier League Completed
या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहणारे कल्पेश घाडे, अनुराग यादव, समीर पाटकर, सखाराम(पप्पु) वेले, अमित पाष्टे, रमेश वाडेकर, सुनील डिंगणकर, अविनाश वनये, दिलीप(पंड्या) वेले, दिनेश वेले, मारुती वेले, विकास मुंडेकर यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडली. Bhatgaon Premier League Completed
भातगाव प्रीमियर लिग रायझिंग स्टार भातगाव संघाचे संघमालक देवेंद्र गावडे/नंदु वेले/प्रमोद वरवटकर यांनी द्वितीय पारितोषिकेतुन मिळालेल्या रकमेतुन श्री अरुण पांडुरंग डिंगणकर यांना 2000 रुपये मदत केली आणि भातगाव गोळेवाडीतील गावकर श्री लक्ष्मण सखाराम आग्रे यांच्या सभागृहाला 1000 रु देणगी देण्यात आली. तसेच राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रथम पारितोषिकेतुन 30% मिळणाऱ्या रकमेतुन संघाच्या खेळाडूंनी 10%(2000) रूपये श्री अरुण पांडुरंग डिंगणकर यांना मदत केली. Bhatgaon Premier League Completed
या स्पर्धेला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई गुहागर शाखा अध्यक्ष श्री कृष्णा वने, गुहागर शाखेचे खजिनदार श्री शंकर ठोंबरे, गुहागर कुणबी क्रिडा समिती अध्यक्ष श्री विवेक कातकर, खजिनदार श्री संजय काजरे, तसेच भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर, गुहागर सत्ताचे संपादक श्री मांडवकर, जैतापकर साहेबांच्या वैद्यकीय टीमचे प्रमुख मनोज डाफले या सर्वांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित केले व आलेल्या पाहुण्यांचे वरिष्ठांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Bhatgaon Premier League Completed
सचिन वेले, सुनील डिंगणकर, अविनाश वनये, अविनाश वेले, किरण हुमणे, प्रदीप सोलकर, किरण डिंगणकर, रमेश वाडेकर, विजय मुंडेकर, दिनेश वेले, निलेश हुमणे, प्रमोद वरवटकर, मिलिंद मुंडेकर, मुरलीधर आग्रे, शंकर आग्रे,विनोद मुंडेकर, देवेंद्र गावडे, नंदु वेले, अनोद मुंडेकर, विश्वास डिंगणकर, विनोद सुवरे, नितीन वेले, मंगेश सुवरे, रविंद्र आग्रे, मुकेश सोलकर, रमेश पाष्टे, दिलीप मुंडेकर, दिलीप वेले, भरत आग्रे, संजय वेले-कोसबी आणि सर्व क्रीडा समिती, मुख्य समिती, कुणबी एकता प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते. भातगावचे श्री प्रमोद पाष्टे, श्री अभि वनये, श्री शिवाजी वेले, विजय वेले यांनी संपुर्ण स्पर्धेचे समालोचक केले. तर सूत्रसंचालन मिलिंद मुंडेकर यांनी केले. Bhatgaon Premier League Completed
ही स्पर्धा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी क्रिडा कमिटी अहोरात्रो मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. तसेच कुणबी एकता प्रतिष्ठान भातगावचे कार्यकर्ते सर्व खेळाडु पदाधिकारी आणि वरिष्ठ मंडळी यांच्या सहकार्याने या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. Bhatgaon Premier League Completed