• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली येथे भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

by Guhagar News
December 8, 2023
in Guhagar
106 1
0
Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli
209
SHARES
597
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरवेली ग्रामस्थ व सरपंच संघटनातर्फे आयोजन

गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका सरपंच संघटना, ग्रामपंचायत वरवेली व वरवेली ग्रामस्थांच्या वतीने आपल्या व्याख्यानातून संपूर्ण देशभरात युट्युब ॲपच्या माध्यमातून गाजलेले तसेच सरपंच पदावर असताना आपल्या कार्यकाळात विविध पुरस्कार प्राप्त करून देणारे बहुजनांचे व्याख्याते, माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार सोहळा वरवेली ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. यावेळी गुहागर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष व वेळणेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच चैतन्य धोपावकर, वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ तसेच कोकणी मेवा देऊन सत्कार करण्यात आला. Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli

यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करताना भास्कर पेरे पाटील यांनी एका माजी सरपंचाचा सत्कार करण्यासाठी व त्याचे विचार ऐकण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच एकत्र येतात, याचा अर्थ कुठेतरी सरपंचामध्ये जागृतता आहे. गावासाठी काहीतरी करायचा आहे अशी जिद्द आहे. गावाच्या सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प केला पाहिजे. मी विठ्ठलाचा परमभक्त असलो, तरी पंढरपूरच्या विठ्ठलापेक्षा मला गावचा सरपंच जास्त आवडतो. कारण सरपंच हा गावाच्या विकासासाठी, गोरगरीब, गरजू जनतेसाठी तो रात्रंदिवस काम करत असतो. सरपंचांनी कुठल्याही पक्षाशी जवळीक करू नये. जवळीक केल्याने सरपंचांचा आवाज दाबला जातो. शासनाकडून प्रत्येक गोष्टीला निधी मिळत असून देखील गावाची सुधारणा होत नसेल तर आपले आर्थिक नियोजन कुठेतरी चुकत आहे याचे आत्मपरीक्षण करावे. Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli


कोकणातील वनसंपदा वाचवण्यासाठी गावातील सरपंचांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ही वनसंपदा कशी वाचेल याकडे लक्ष दिला पाहिजे. गावातील लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. ग्रामपंचायत बॉडीमध्ये मतभेद असता कामा नये, गावातील नागरिक शंभर वर्षे कसे जगतील याचा विचार करावा. त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे. गावाला चांगल्या सुविधा जर दिल्या तर गावामध्ये चांगले वातावरण निर्माण होऊन गावातील लोक नक्कीच सरपंचाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे शेवटी सांगितले. Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli

या कार्यक्रमाला सरपंच शैलजा गुरव, सचिन म्हसकर, महेश जामसूतकर यांच्यासह वरवेली ग्रामपंचायत उपसरपंच मृणाल विचारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार, गणेश किर्वे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, श्रावणी शिंदे, शैलेश नारकर, अरुण रावणग, सेजल शिंदे, धनश्री चांदोरकर, नरेश रांजाणे, ग्रामसेवक महेंद्र भुवड उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli

Tags: Bhaskarrao Pere Patil felicitated at VaraveliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.