• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्कर जाधव यांची रोखठोक भूमिका

by Ganesh Dhanawade
September 5, 2022
in Guhagar
16 0
1
Bhaskar Jadhav's solid role
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोण रामदास कदम ? त्यांच्या एवढा कृतघ्न माणूस कधी पाहिला नाही ; आ. जाधव

गुहागर ता. 05 : कोण हे रामदास कदम ? त्यांच्या इतका कृतघ्न माणूस मी कर्धाच पाहिला नाही. शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायचा की नाही, हे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे ठरवतील. तुम्ही मध्ये कशाला बडबड करता! अहो, ज्या शिवतिर्थावर शिवसेना नेते म्हणून तुम्हाला जननेला संबोधित करण्याची संधी मिळाली. ते तुम्ही एवढे कृतघ्न कसे काय झालात?अशी घणाघाती टिका गुहागरचे आमदार व नवनिर्वाचित शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. Bhaskar Jadhav’s solid role

शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर गुहागर तालुका शिवसेनेतर्फे भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यासाठी शृंगारतळीच्या भवानी सभागृहात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी विविध प्रशांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर मी अजून पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना भेटलो नाही. म्हणून गणेशोत्सव झाल्यानंतर त्यांची भेट घेणार आहे, असे सांगून आ. भास्कर जाधव म्हणाले की, माझ्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, ते मी जाणून घेणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वाढीसाठी मी महाराष्ट्रभर दौरा करण्याचा मनोदय केला. असून त्याची सुरुवात मी रायगडावरील शिव समाधीला अभिवादन करून करणार आहे. Bhaskar Jadhav’s solid role

Bhaskar Jadhav's solid role

मुंबई महानगर पालिका कोणत्याहि परिस्थितीत जिंकायच्या व त्यासाठी वाट्टेल ते करण्याची भाजपाने तयारी केली आहे, असे सांगून आम. जाधव म्हणाले की, ज्या ज्या राज्यात भाजपाने सत्ता मिळविली तिथला इतिहास पहा. यासाठी जातीय दंगली घडवून आणणे व लोकांचे ध्यान इतरत्र वळविणे हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप वाले जाती – धर्मात तेढ वाढवून वाद वाढवतील. त्यासाठी लोकांनी सजग राहिले पाहिजे. Bhaskar Jadhav’s solid role


शिवसेनेचे ४० आमदार त्यांनी फोडले. परंतू ४ लाख कार्यकर्ते अधिक वाढले. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपवाल्यांना ते शक्य झाले नाही. उलट शांत, संयमी, कणखर नेतृत्वाच्या मागे जनता मोठ्या संख्येने उभी राहात आहे. अडीच वर्ष सेना व महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी हजारो हातखंडे वापरले. परंतू महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपत्या कौशल्याने सत्ता टिकवली. मात्र आपत्याच अस्तनीतले निखारे अखेर त्यांनी उपयोगात आणले. सालस, संयमी आपला नेता म्हणून उद्धव साहेबांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. ते पुसणे कोणालाही शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. Bhaskar Jadhav’s solid role

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, तालुका महिला संघटक नेत्रा ठाकूर,  माजी जि.प. सदस्य प्रवीण ओक, माजी जि.प. उपाध्यक्ष  महेश नाटेकर, माजी गुहागर पं.स. सभापती पूर्वी निमुणकर, युवसेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, पारिजात कांबळे, माजी सभापती सुनील पवार, पाटपन्हाळे ग्रा.पं. चे सरपंच संजय पवार, विनायक मुळे, इम्रान घारे, उमेश खैर, बावाशेठ तांडेल यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. Bhaskar Jadhav’s solid role

Tags: Bhaskar Jadhav's solid roleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.