गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार 2024 देण्यात आला. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री समर्थ भंडारी नागरिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांना गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. Bhaskar Award to Prabhakar Arekar
प्रभाकर आरेकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले. सहकार क्षेत्रातील अनुभव व समाजासाठी काहीतरी करण्याचे उद्देशाने सन 2022 मध्ये त्यांनी श्री समर्थ भंडारी नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेचे एकूण 17 शाखा रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. प्रभाकर आरेकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची किसान स्टाफ सोसायटी अध्यक्ष तसेच अनेक वर्ष संचालक पद सांभाळले आहे. ते काही काळ गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सहकारी बँक कर्मचारी संघ या युनियनचे ते काही काळ अध्यक्ष होते. Bhaskar Award to Prabhakar Arekar
प्रभाकर आरेकर यांना याआधी नॅशनल युनिटी अवॉर्ड, सकाळ समूहाचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र बेस्ट चेअरमन पुरस्कार, व भंडारी एकीकरण समिती मुंबईचा समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा भास्कर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यापुढे ही सहकार क्षेत्रासाठी भरीव योगदान देऊन त्या माध्यमातून समाजाचा आर्थिक उत्कर्ष करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी संस्था अध्यक्ष डॉक्टर राजीव लोहार, स्मिता आरेकर, पराग आरेकर व अनेक मान्यवर उपस्थित होते. Bhaskar Award to Prabhakar Arekar