भन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन
संदेश कदम, आबलोली
आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच धम्म होय. असे प्रतिपादन आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी (बदलापूर) यांनी केले. ते आबलोली येथील बुध्द विहारात आयोजीत प्रवचनात बोलत होते. Bhanteji Bodhi’s discourse at Abaloli
आबलोली, ता. गुहागर येथील आनंदवन बुध्द विहाराचा वर्धापन दिन रौप्य महोत्सव व भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भगवान गौतम बुध्द यांची २५६७ वी जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Bhanteji Bodhi’s discourse at Abaloli

महोत्सवाचे प्रमुख अतिथी भन्तेजी डॉ. एन. आनंद महाथेरो (सिलोन) यांचे शिष्य आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी (बदलापूर) यांचे दिनांक १७ मे २०२३ रोजी आबलोलीत आगमन झाले त्यांना आबलोली बाजारपेठेत समता सैनिक दलाने मानवंदना दिली. मिरवणूकीने, रॕलीने महामानवांच्या घोषणा देत त्यांना बुध्द विहारात आणण्यात आले. भन्तेजी महेंद्रा बोधी यांच्या हस्ते बुध्द पुजा पाठ व बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाला. धम्मदेसना दिल्यानंतर आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी (बदलापूर) यांनी बुध्द आणि त्यांचा धम्म व सद्यस्थिती या विषयावर प्रवचन केले. Bhanteji Bodhi’s discourse at Abaloli

मौलीक मार्गदर्शन करताना आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांच्या जीवनाचे कल्याण व्हावे, मंगल व्हावे, तथागत गौतम बुध्दांचा पवित्र विज्ञानवादी बुध्द धम्म नीट समजावा म्हणून आपल्याला २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या प्रतिज्ञा आपण जर अंगिकारल्या, पाळल्या तर आपल्या जीवनाचे सोनं होईल मंगल होईल. आपल्या जीवनात क्रांती घडून येईल. म्हणूनच आपण धम्म समजून घेतला पाहिजे. आपल्याला माणसासारखे वागायचे असेल, आदर्श माणूस म्हणून जगायचे असेल तर संस्कारांची गरज आहे. तेच संस्कार तथागतांनी आपल्याला धम्मामध्ये दिले आहेत. तथागतांचा धम्म मार्ग हा विज्ञानावर आधारीत असून तुमच्या मनाच्या मांगल्यावर, विज्ञानाच्या कसोटीवर शब्दान शब्द घासून बघा. जर पटला तरच तो धम्ममार्ग स्विकारा. बुध्द धम्म हा आपल्याला प्रगतीकडे, दु:ख मुक्तीकडे घेऊन जातो. ४५ वर्षे तथागतांनी आपले संपूर्ण आयुष्य पायी प्रवास करुन दु:ख मुक्ती केली. अंधश्रद्धा व कुठलेच कर्मकांड बुध्द धम्मात केले जात नाही. आत्मा, परमात्मा, मृत्युनंतरचे अस्तित्व, कर्मकांडाचे स्तोत्र, ज्योतिषशास्त्र या सर्व गोष्टींना तथागतांनी नाकारले आहे. जोपर्यंत तुमच्या मनातले देव जात नाही तोपर्यंत तुमच्या देव्हा-यातील देव जाणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आपल्याला बुध्द समजला आहे त्या बुध्दाच्या विज्ञानवादी धम्म मार्गाने आपण वाटचाल करुया. Bhanteji Bodhi’s discourse at Abaloli

जयंती महोत्सवाचे उद्घाटन आनंदवन बुध्द विहार मुंबई संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी विचारपिठावर स्वागताध्यक्ष म्हणून गाव संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, जेष्ठ मार्गदर्शक बबनराव कदम, एम. बी. पवार, मुंबई संघटनेचे सेक्रेटरी अनिल कदम, गाव संघटनेचे सेक्रेटरी अविनाश कदम, सुरेश रामा पवार, सिताराम कदम, संजय टोलू कदम, संदिप कदम, मिलींद कदम, सिलवर्धन कदम, सुभाष कदम ,मंगेश कदम, सिध्दार्थ पवार, प्रमोद पवार, सुरेश शिवराम कदम, कुमार कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल कदम व अविनाश कदम यांनी केले. Bhanteji Bodhi’s discourse at Abaloli
