शिंदे गटाच्या मजबुतीसाठी कार्यरत, उमेदवारीचीही चर्चा
गुहागर, ता. 25 : Uday Samant Brother in Politics. कोकण विकासासाठी आणण्यात आलेल्या रत्नसिंधू समृद्धी योजनेच्या सदस्यपदी उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ज्येष्ठ बंधू किरण तथा भैय्या सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भैय्या सामंत निवडणुकीच्या राजकारणातही सक्रीय होणार, असे संकेत मिळत आहेत. Bhaiya Samant active in politics
सध्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुक लढवली तेव्हापासून त्यांचे ज्येष्ठ बंधु किरण सामंत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. पहिली उदय सामंत यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभेच्या बांधणीसाठी पडद्यामागचे कलाकार भैय्या सामंत होते. विरोधकांनाही आपलेसे करणारे, राजकीय वारे ओळखणारे आणि त्यानुसार निवडणुकीची रणनिती आखणारे म्हणून किरण तथा भैय्या सामंत यांची ओळख आहे. त्यामुळेच उदय सामंत चार वेळा आमदार, तीन वेळा मंत्री झाले. मात्र पडद्यामागे महत्त्वाची भुमिका निभावणारे किरण सामंत कधीही राजकीय व्यासपीठावर आले नव्हते. Bhaiya Samant active in politics

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उलथापालथीमध्ये मंत्री उदय सामंत हे देखील शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गट मजबुत करण्यासाठी भैय्या सामंत सक्रीय झाले. रत्नागिरी सह गुहागर तालुक्यातील अनेक शिवसैनिकांना शिंदे गटात सहभागी करुन घेण्यामध्ये किरण तथा भैय्या सामंत यांचा मोठा वाटा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचा प्रभाव दाखवून देण्याची गरज आहे. त्यासाठी भैय्या सामंत मोर्चेबांधणी करत आहेत. Bhaiya Samant active in politics
दरम्यान शिंदे गटातील मंत्री आणि सत्तांतराच्या वेळी अत्यंत संयमी भुमिका निभावणारे दिपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजनेच्या समितीमध्ये भैय्या सामंत यांच्या नावाची सदस्य म्हणून शिफारस केली. ही शिफारस तातडीने मान्यही झाली. राणे आणि केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या पार्श्र्वभुमीवर रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातून शिंदे गटाकडून खासदारकीचे तिकीट किरण सामंत यांना मिळेल अशी चर्चा आत्तापासूनच सुरु झाली आहे. तर गुहागरमधील सध्याचे आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी तीतकाच तगडा उमेदवार हवा. असे सांगत शिवसेनेतून बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना गुहागरमधुन उमेदवारी मिळावी. असा आग्रह सुरु केला आहे. त्यामुळेच आजवर कधीही राजकीय पटलावर फारसे न आलेले भैय्या सामंत निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय होणार अशी चर्चा रंगु लागली आहे. Bhaiya Samant active in politics