ब्राह्मण समाज मर्यादित निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धा, 16 संघांचा सहभाग
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, व्याघ्रांबरी मंदिरासमोर भाटवणे गुहागर येथे ब्राह्मण समाज मर्यादित निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय भगवान परशुराम चषक 2025 ओव्हर क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आला. Bhagwan Parshuram Cup tournament begins


या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. दि. 14 ते दि. 16 मार्च या कालावधीत गुहागर ब्रह्मरुंद यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 33,333/- द्वितीय क्रमांकास 22,222/- तृतीय क्रमांकास11,111 /- चतुर्थ क्रमांकास 11,111 /- रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर अशी इतर पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे. Bhagwan Parshuram Cup tournament begins


स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमास उद्योजक श्रीराम खरे, श्री दुर्गादेवी देवस्थाचे अध्यक्ष किरण खरे, सुनील खरे, डॉ. मंदार आठवले, माजी नगरसेवक समीर घाणेकर, गजानन वेल्हाळ, सचिन मुसळे, सचिन ओक आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या स्पर्धेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. खेळाडू आणि महिला प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. Bhagwan Parshuram Cup tournament begins