चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी आगाराचे उत्तम नियोजन
गुहागर, ता.08 : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार सज्ज झाले आहे. आतापर्यंत आगारातून तब्बल २३९ गाड्या बुक झाल्या आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील विविध भागात गुहागर आगारातर्फे या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती गुहागरचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी दिली आहे. Better planning of Guhagar Agar


दोन वर्षाच्या कोविड काळातील अनेक निर्बंधानंतर यावर्षी मुक्तपणे गणेश उसव साजरा करण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर कोकणातील गणेश भक्त चाकरमानी आपापल्या घरी येऊन पोचले. ट्रेन, खाजगी ट्रॅव्हल्स, भाड्याच्या किंवा स्वतःच्या कार व एसटीच्या माध्यमातून गणेश भक्तांनी आपल्या घरी हा सण उत्साहात साजरा केला. परंतू, हे करत असतानाच या सर्वांचे लक्ष परतीच्या प्रवासाकडे लागले होते. Better planning of Guhagar Agar
गेल्यावर्षी गणेशोसवावर कोरोनाची छाया होती. तरी अनेक जण निर्बंध झुगारून गावी आले होते. त्यावेळी त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत १२४ एसटी च्या जादा बसेस गुहागर आगारातून सोडण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी त्यामध्ये जवळपास दुप्पट गाड्यांची भर पडली आहे. गुहागर आगाराच्या तब्बल २३९ जादा गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, विरार, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, बोरीवली, विठ्ठलवाडी अशा विविध मार्गावर या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या जादा गाडया असल्या तरी कोणत्याही प्रकारचा जादा भार प्रवाशांवर टाकलेला नसून सर्व साध्या दरातील तिकीटात प्रवाशांना सेवा उपलव्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे ही आगार प्रमुख कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. Better planning of Guhagar Agar


बुक झालेल्या जादा गाडया राज्यातील इतर आगारामधून मागविल्या असून आगारातून रोजच्या सुटणाऱ्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजनावर त्याचा पारिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आत्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगारातील वाहक – चालक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी या वाहतूकीचे नियोजन केले असून गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही स्पष्ट केले आहे. Better planning of Guhagar Agar