कुणबी समाजाला न्याय मिळणार
गुहागर, ता. 27 : संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती, सहदेव बेटकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा बंगल्यावर शेकडो कार्यकर्ते घेवून पक्षात प्रवेश केला. दिवाळीच्या शुभ मुर्तावर बेटकर यांना मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे महाराष्ट्रमधील एका महामंडळाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. Betkar’s appointment on the corporation

सहदेव बेटकर यांनी प्रवेश केल्यानंतर पायाला भिंगरी लावून ते रत्नागिरी जिह्यात फिरायला सुरवात केली आहे. भास्करराव जाधव यांच्या विरोधात गुहागर मतदार संघातुन निवडणुक लढावल्यावर हार पटकरावी लागली होती. मात्र सहदेव बेटकर यांनी कंबर खसली असून आता पासूनच ते गुहागर विधानसभा मतदार संघात कामाला लागले आहेत. बेटकर यांच्या रूपात कुणबी समाजाला न्याय मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामधील एका मोठ्या महामंडळाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येणार आहे. हे नेमके कोणते महामंडळ आहे हे गुपित ठेवण्यात आले आहे. मात्र याची चर्चा सुरु झाली असून सहदेव बेटकरांच्या कार्यकर्त्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आता त्यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळणार आहेत याची उत्सुकता कार्यकर्त्याना लागली आहे. Betkar’s appointment on the corporation