गुहागर, ता. 20 : येथील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहीलेले, पुर्वाश्रमीचे शिवसैनिक सहदेव बेटकर शिंदे गटात सामिल होणार अशी चर्चा आहे. बेटकर यांच्यामुळे शिंदे गटाला कोकणात ओबीसी समाजातील चेहरा मिळेल. Betkar will join the Shinde group
संगमेश्वर तालुक्यातील शेनवडे गावचे सहदेव बेटकर उद्योजक आहेत. पहिल्यापासून शिवसैनिक असलेले बेटकर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व सभापती होते. 2014 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांना गुहागर विधानसभा क्षेत्रात संपर्क वाढविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले आणि सहदेव बेटकर यांच्या उमेदवारीवर संकट कोसळले. विविध मार्गांनी प्रयत्न करुनही शिवसेनेकडून गुहागर विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळणार नाही. हे निश्चित झाल्यावर सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतरही ते विधानसभा कार्यक्षेत्रात फिरले. संपर्क वाढवला. याच ठिकाणी पुन्हा उमेदवारी द्यावी, असा शब्द त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागितला होता. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही मागणी फेटाळली. त्यानंतर त्यांच्या गुहागर तालुक्यातील प्रवास, संपर्क कमी झाला. Betkar will join the Shinde group
या पार्श्वभूमीवर सहदेव बेटकर शिंदे गटात जात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून ते शिंदे गटात जात असले तरी गुहागर विधानसभा मतदारसंघात फार मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार नाही. परंतू संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेचे नुकसान होईल. Betkar will join the Shinde group
त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील ओबीसी शिवसैनिकांमधील एका गटाला ते शिंदे गटात समाविष्ट करू शकतात. एवढा त्यांचा प्रभाव निश्चितपणे आहे. कोकणातील बहुसंख्य समाजाचे नेतृत्व करणारा ओबीसी चेहरा शिंदे गटाला मिळेल. म्हणूनच सहदेव बेटकर यांच्या शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशाला महत्त्व आहे. घटस्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूणला येणार अशी चर्चा आहे. या कार्यक्रमात बेटकर प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे. Betkar will join the Shinde group