ॲड. माधवी नाईक, मुलींच्या रक्षणाची गरज उरणार नाही
गुहागर, ता. 01 : बेटी बचाव, बेटी पढाव या उपक्रमाचा भाग म्हणून संस्थांनी मुलांवर स्त्री सन्मानाचा संस्कार करणारे कार्यक्रमही वर्षातून एकदा घ्यावेत. त्यामुळे उद्याचा सुजाण नागरिक होणारा मुलगा समाजामध्ये भान ठेवून वावरेल. मग मुलींच्या रक्षणासाठी कोणत्याही कायद्याची, न्यायालयांची गरजच उरणार नाही. असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक यांनी केले. त्या दुर्गादेवी देवस्थानच्या कार्यक्रमात बोलत होत्या. Beti Rescue, Beti Education Activities by Durga Devi Temple
16 व्या वर्धापन दिन महोत्सवात दुर्गादेवी देवस्थानतर्फे 125 मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना ॲड. माधवी नाईक म्हणाल्या की, भुतकाळाच्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण थोडंस कमी झालायं. याच कारण समाज व्यवस्थाच महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुरक वातावरण निर्मितीचे काम करत आहे. दुर्गादेवी देवस्थानप्रमाणे महिलांना आत्मसन्मान मिळवून देणारे उबदार उपक्रम देशभरात होत आहेत. हरियाणातील एक पित्याने सुरु केलेल्या मोहिमेला पंतप्रधान मोदींनी बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाद्वारे देशात पोचवले. आपल्या देशात जे चांगल काम करताना त्यांना मन की बातद्वार व्यासपीठ देवून ते काम जगासमोर आणण्याचे काम पंतप्रधान करतात. आज देशभरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत इतके कार्यक्रम होतात की एखादी मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचा सोहळा साजरा होतो. मुलींबरोबर देवस्थानने मातांचाही सन्मानही केला. सासरी आणि माहेरी वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना गुळाच्या गोडव्याने बांधुन ठेवणाऱ्या महिलेचा सन्मान जाहीरपणे होतो हे कौतुकास्पद आहे. Beti Rescue, Beti Education Activities by Durga Devi Temple
देवस्थानने शिष्यवृत्ती देताना तू खंबीर आहेस, धीट आहेस. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबरोबर चार हात करण्याची क्षमता तुझ्यात आहे. हा संदेश दिला आहे. आपणही मुलींना भिती दाखविण्यापेक्षा संकटाचा सामना करायला शिकवले पाहिजे. आपली मानसिकता बदलली तर मुली भितीच्या, अबेलेच्या मानसिकतेतून बाहेर पडतील. ज्या घरात मुलगा जन्माला येतो त्याच्यावर असे संस्कार करा की, आपल्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो. आपल्या मुलांसमोर पत्नीचा आईचा अपमान करु नका. आयाबहीणींवरुन शिव्या घालु नका. समाजाने याचे भान ठेवले, समाज म्हणून आपण सर्वांनी असे योगदान दिले तर मग स्त्रीया आत्मविश्र्वासाने खंबीरपणे जगात पाय रोवून उभ्या राहु शकतील. Beti Rescue, Beti Education Activities by Durga Devi Temple
या कार्यक्रमाला सौ. निलमताई गोंधळी, प्रदेश उपाध्यक्षा भाजप महिला मोर्चा, सौ. स्मीताताई जावकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा – भाजप महिला मोर्चा, सौ. प्रतिभाताई वराळे, तहसीलदार गुहागर, संतोष जैतापकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष – ओबीसी सेल, भाजप, निलेश सुर्वे, गुहागर तालुका अध्यक्ष – भाजप, दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, आदी मान्यवर उपस्थित होते. Beti Rescue, Beti Education Activities by Durga Devi Temple