• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चारुता आठवले हीला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार

by Manoj Bavdhankar
January 29, 2024
in Guhagar
230 2
0
Best Student Godbole Award to Charuta Athavale
452
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 :  श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरची विद्यार्थिनी चारुता मंदार आठवले  (इ. 10) हिला चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 28 जानेवारी रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झाला. या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मोहन जोशी, वक्ते डॉ. सागर प्रकाश देशपांडे तर निवड समितीमधील डॉ प्रसाद देवधर, मुकुंद कानडे, प्रा.सोनाली खर्चे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. Best Student Godbole Award to Charuta Athavale

चारुता आठवले हीला एस. एस. सी नंतर विज्ञान शाखेचा अभ्यास करून पुढे वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची आवड आहे. गॉडफादर, आय डेअर, इन्फर्लो अश्या प्रकारची पुस्तके आवडतात. अखिल भारतीय विज्ञान मेळावा वकृत्व स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा यांमध्ये तिने उत्तम कामगिरी बजावली आहे. नियमित सूर्यनमस्कार घालणाऱ्या चारुताला सकाळ वृत्तपत्र वाचायला आवडते तसेच गाण्याचे कार्यक्रम पाहायला आवडतात. तिने इ. ८ वी आणि ९वी मध्ये सलग दोन वर्षे शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नृत्य आणि गावच्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हायला आवडते. Best Student Godbole Award to Charuta Athavale

Best Student Godbole Award to Charuta Athavale

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार 2024 या चतुरंग प्रतिष्ठान आयोजित 33 शाळांमधील 33 सर्वोत्तम विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यात अनुष्का सचिन सकपाळ (9वी) श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डे. आर्या संतोष बोरकर (माध्यमिक विद्यालय वरवडे) अध्याय अरविंद सकपाळ  (धोंडीराम रामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डी चिंचघरी) श्रेया अमर पुदाले( 10 वी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड. आदित्य विश्वास गोंधळी (ग ज तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर. हर्ष विलास मोहिते (मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यामंदिर अलोरे). सृष्टी हेमंत तांबे (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे)अमेय अनिल लोहार (विश्वनाथ विद्यालय लवेल). वेदा विनोद लाड (सद्गुरु काड सिद्धेश्वर विद्यालय गुंणदे) पुष्कर विजय सावंत( न्यू इंग्लिश स्कूल पोकळी) अनुज राजेंद्र राऊत(मा.ल.भा हेदवकर विद्यानिकेतन हेदेवी) प्रतीक्षा अनिल कांबळे( कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे) कोमल मांगीलाल पटेल (माखजन इंग्लिशस्कूल ,माखजन ) ऋग्वेद केदार रेमणे( श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय कोंडगाव). सावनी संभाजी आंब्रे (न्यू इंग्लिश स्कूल देवरुख) हर्ष हेमचंद्र कस्तुर (न्यू इंग्लिश स्कूल लांजा) पार्थ केतन ब्रिज( कै सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली) ईशा संदेश रहाटे (रा.भ.शिर्के प्रशाला रत्नागिरी) नीती रत्नाकर चौधरी (,परांजपे मोतीवाला हायस्कूल चिपळूण) ओम विजय कदम (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण) पार्थ प्रसाद चितळे (युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण) शुभम विनायक पाटील (ए.जी.हायस्कूल दापोली) वैभवी प्रभाकर थरवळ( वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्ग ताम्हाने) रोशन अविनाश सावंत (रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली) श्रिया अभिजीत केळकर( बळीराम परकर विद्यालय मालगुंड) श्रेयस सतीश विचारे( चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली). निकिता मंगेश जोशी (श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत). रिया प्रकाश विचारे( न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे)श्रुती विजय बोरवणकर( राजापूर स्कूल राजापूर) गुंजन आशिष खवळे (श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख) विणा योगेश काळे( फाटक हायस्कूल रत्नागिरी ) गायत्री नरेंद्र फडके (एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम) या 33 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. Best Student Godbole Award to Charuta Athavale

या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पाचशे रुपये किमतीची पुस्तक व स्व. पुरुषोत्तम व स्व. पद्मजा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कार रोख रुपये एक हजार देऊन गौरव करण्यात आला. Best Student Godbole Award to Charuta Athavale

Tags: Best Student Godbole Award to Charuta AthavaleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share181SendTweet113
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.