गुहागर, ता. 01 : वेळणेश्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय (Maharshi Parasuram College of Engineering Velaneshwar ) उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या ह्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक ३० जुन २०२३ रोजी झालेल्या Indian Achievers Awards 2023 या समारंभात Best Industrial Interface College of The Year ” असा पुरस्कार राज्यपाल विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते, प्रसिद्ध सिने अभिनेता गुलशन ग्रोव्हर, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. नरेंद्रकुमार सोनी यांनी स्वीकारला. Best Industrial Interface College Award to Velaneshwar College


रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. हे महाविद्यालय २०१२ साली प्रत्यक्ष सुरू झाले. Best Industrial Interface College Award to Velaneshwar College
सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅक चे मानांकन प्राप्त झाले. एवढ्या कमी कालावधीत नॅक चे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्वात तरुण महाविद्यालय म्हणजे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर आहे. Best Industrial Interface College Award to Velaneshwar College
विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना’ 2020 पासून सुरू केली आणि विद्या प्रसारक मंडळाची शिष्यवृत्ती सुरू केली या माध्यमातून १५० विद्यार्थ्यांना प्रथम आणि थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. Best Industrial Interface College Award to Velaneshwar College
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उद्योगाभिमुख शिक्षण देण्यावर महाविद्यालयाचा विशेष भर असतो. याकरिता भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिकांनी महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन, तसेच विविध कंपन्यातील प्रथितयश व्यवस्थापक यांनी केले मार्गदर्शन इत्यादी योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालय राबवत आहे. यामुळेच यावर्षी महाविद्यालयातील 100% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळविण्यात यश मिळाले. यातील 45% विद्यार्थ्यांकडे 2 नोकरीच्या ऑफर आहेत. Best Industrial Interface College Award to Velaneshwar College