ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल यांचा निरोप समारंभ
गुहागर, ता. 30 : पाटपन्हाळे ग्रामपंचायत ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायतीचे (Patpanhale Gram Panchayat) स्मरणिकेचे प्रकाशन. व ग्रा. कार्यतत्पर ग्रामविकास अधिकारी श्री. आर. जी. बेंडल त्यांचा निरोप समारंभ उद्या दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात येत आहे. Bendall’s Farewell Ceremony


शासनाच्या प्रत्येक योजनांची सक्रियपणे अमलबजावणी करणारी, कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे करणारी, व तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील बहुचर्चित पाटपन्हाळे ग्रामपंचायतर्फे गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासाचा आढावा. ग्रामपंचायतीच्या काळात राबविलेले विविध उपक्रम व विकासकामे या स्मरणिकाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांपुढे जावेत, म्हणून ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच या ग्रामपंचायतीमध्ये गेली ७ वर्ष उत्तम सेवा बजावत असताना या ग्रामपंचायतीला नव्या रूपास आणण्यासाठी विशेष भूमिका बजावणारे येथील ग्रामविकास अधिकारी श्री. आर. जी. बेंडल हे सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे. Bendall’s Farewell Ceremony


त्याप्रमाणे समाजकार्यात अग्रेसर आणि विशेष पुरस्कार प्राप्त मान्यवर, १० वीमध्ये उज्वल यश प्राप्त करणारे विद्यार्थी, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. संजय पवार, उपसरपंच उमेश कदम यांनी केले आहे. Bendall’s Farewell Ceremony

