• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मधमाशी पालन मोफत रोजगार मेळावा

by Manoj Bavdhankar
August 9, 2023
in Ratnagiri
78 1
0
Beekeeping Free Employment Fair
154
SHARES
440
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 09 : मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना  तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. 10 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा सकाळी 11 ते 2 या वेळेत नगरवाचनालय राजापूर सभागृह, येथे घेण्यात येणार आहे.

हा मेळावा निःशुल्क/मोफत असून सर्वांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेलरोड रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक ०२३५२/२२२३७९  येथे संपर्क साधावा. Beekeeping Free Employment Fair

कोकण विभागातील जंगल व फळबाग क्षेत्र अशी वैशिष्टय़पूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे शेतीपूरक मध उद्योग सुरू केल्यास वर्षाकाठी चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मध उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात  येत आहे. Beekeeping Free Employment Fair

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती /संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५०% अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशी संरक्षण व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. Beekeeping Free Employment Fair

Tags: Beekeeping Free Employment FairGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.