• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चोरगे अ‍ॅग्रो फार्ममध्ये  मधुमक्षिका पालनाची सुरवात

by Guhagar News
October 8, 2024
in Ratnagiri
116 1
0
Bee keeping at Chorge Agro Farm
228
SHARES
652
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 08 : जिल्ह्यातील चोरगे अ‍ॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिका पालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, तसेच परागीकरण वाढून जैवविविधतेला चालना मिळणार आहे. Bee keeping at Chorge Agro Farm

कोकणातील विशेष हवामान, हिरवळ आणि विविध फुलांच्या प्रजातींमुळे येथे मधमाशांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा घेत, चोरगे अ‍ॅग्रो फार्मने शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशांचे संगोपन आणि मध उत्पादन सुरू केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन कसे करायचे याचे प्रशिक्षण मिळण्याबरोबरच, त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. Bee keeping at Chorge Agro Farm

Bee keeping at Chorge Agro Farm

चोरगे अ‍ॅग्रो फार्मने युनिटच्या माध्यमातून मधमाशा पालनाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणार  आहे, ते म्हणजे *मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र* सुरू करणे. या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना मधमाशा पालनाचे तांत्रिक ज्ञान, संगोपन पद्धती, आणि उत्पादकता वाढवण्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून स्थानिक शेतकऱ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करून आपली आर्थिक स्थिती सुधारता येईल. Bee keeping at Chorge Agro Farm

चोरगे  फार्मचे संस्थापक डॉ. निखिल  चोरगे म्हणाले, “मधमाशांचे पालन फक्त मध उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर ते परागीकरणामुळे इतर कृषी उत्पादनांनाही वाढवते. कोकणातील शेतकऱ्यांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.” चोरगे अ‍ॅग्रो फार्मवर उत्पादित मध स्थानिक तसेच देशभरातील बाजारपेठेत वितरित केले जाणार आहे. पर्यटकांसाठी मधमाशांचे पालन कसे केले जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून कृषी पर्यटनामध्ये एक नवा उपक्रम सुरू केला जाईल. कोकणातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घेऊन मधमाशा पालनाचे प्रशिक्षण घेतल्यास, त्याचा फायदा फळबागा, भातशेती, आणि इतर कृषी उद्योगांवर होईल, आणि कोकणातील कृषी क्षेत्राला एक नवा आयाम मिळेल. या प्रकल्पासाठी खादी  ग्राम उद्योग चे मास्टर ट्रेनर भारत सरकार व इंडी सहयोग परिवार या संस्थे संचालक श्री प्रशांत रामचंद्र सावंत यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले. Bee keeping at Chorge Agro Farm

Tags: Bee keeping at Chorge Agro FarmGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.