गुहागर, ता. 18 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी येथे एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यताप्राप्त बीसीए हा कोर्स सुरू आहे. या कोर्ससाठी SC/ST/NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश,OBC/SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती व OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. BCA-CET exam is mandatory for BCA course


CET च्या नोंदणीची शेवटची तारीख २० मार्च २०२५ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने CET अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.mahacet.org या संकेतस्थळावर भरवा असे आवाहन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या वतीने करण्यात येत आहे तसेच या सीईटी परीक्षेचे अर्ज सकाळी १०.०० ते ४.३० या वेळेत रिगल कॉलेज शृंगारतळी येथे मोफत भरून मिळतील याची इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. BCA-CET exam is mandatory for BCA course
आजवर बीसीए या कोर्ससाठी कोणतीही प्रवेश परीक्षा(CET)अनिवार्य नव्हती, परंतु शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए हा कोर्स करायचा असल्यास बीसीए-सीईटी देणे बंधनकारक आहे. आजवर सीईटी नसल्याने अनेक विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात बीसीए या अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित करत होते. आता मात्र CET परीक्षा अनिवार्य असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये नसलेल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही BCA या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार नाही. अधिक माहितीसाठी ७८७५८४३००६ /७०६६०३४२००/९०७५७७५८०७ या क्रमांकावर संपर्क करावा. BCA-CET exam is mandatory for BCA course