चिपळूण अर्बन बँक लि. गुहागर शाखेचा उपक्रम
गुहागर, ता. 21 : श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ग्राहकांची हक्काची आणि विश्वासाची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूण अर्बन बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कर्ज योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने बँकेचे स्टॉल लावण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. Bank stalls for customers at the festival

सोमवार दि. २० ते बुधवार दि. २२ रोजी या कालावधीत श्री व्याडेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शाकाहारी पदार्थांचे स्टॉल तसेच विविध वस्तुंचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. बँकेचे संचालक श्री. धनंजय खातू यांच्या संकल्पनेतून या महोत्सवामध्ये बँकेच्या गुहागर शाखेचा स्टॉल असणार आहे. बँकेच्या कर्ज व ठेवींच्या विविध आकर्षक योजनांची माहिती या परिसरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा उपयोग शाखा गुहागरसह परिसरातील शृंगारतळी, आबलोली, मार्गताम्हाने या शाखांना होणार आहे. Bank stalls for customers at the festival
या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी संचालक श्री. खातू, बँकेचे सीईओ श्री. देसाई यांचे मार्गदर्शन व गुहागर शाखाधिकारी श्री. शैलेश देवळेकर, श्री. रजनीश सकपाळ व बँकेचे कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहे. Bank stalls for customers at the festival

