चिपळूण; सुसाईड नोटमधील चौघांवर गुन्हा दाखल
गुहागर, ता. 25 : चिपळूण शहरातील एका नामांकित बँकेचे डेप्युटी मॅनेजर मुकुंद मुरलीधर पालांडे यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर अखेर कोळकेवाडी – हसरेवाडी स्मशानभूमी लगतच्या धरण परिसरात सापडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण चिपळूण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. Bank Deputy Manager’s Body Found in Dam
मुकुंद पालांडे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि पोलीस यंत्रणेकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता. अखेर त्यांचा मृतदेह कोळकेवाडी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद पालांडे यांनी एक चार पानांची सविस्तर सुसाइड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांची नावे जाहीर केली असून, त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. Bank Deputy Manager’s Body Found in Dam

मिळालेल्या माहितीनुसार मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मुकुंद पालांडे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पालांडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्रात नाव असलेल्या चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाची नोंद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एका बँक अधिकाऱ्याच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. Bank Deputy Manager’s Body Found in Dam