• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्रीस पूर्णतः बंदी

by Guhagar News
May 10, 2023
in Politics
70 1
0
Guhagar by-election unopposed
138
SHARES
393
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, दि. 09 : जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. ही  निवडणूक २१० रिक्त सदस्य पदे व ८ थेट सरपंच रिक्त पदांसाठी आहे. दि. १८ मे, २०२३ रोजी मतदान व दि. १९ मे, २०२३ रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. Ban on sale of liquor in election areas

ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती (सीएल-३, एफएल-२, सीएल/एफएल/ टिओडी-३, एफएल-३, एफएल/बीआर-२, टिडी-१ इत्यादी) दि. 17,18,19 मे रोजी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. Ban on sale of liquor in election areas

ज्या ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल, तेथे हे आदेश लागू होणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५४ व ५६ मधील तरतुदींनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. Ban on sale of liquor in election areas

Tags: Ban on sale of liquor in election areasGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.