• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कै. बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन

by Mayuresh Patnakar
August 22, 2026
in Ratnagiri
16 0
0
Balasaheb Kher Birth Anniversary
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 22 : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे संस्थापक व मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व थोर मानवतावादी कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त यावर्षीचा ‘बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ उद्या रविवार, दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात होणार आहे. Balasaheb Kher Birth Anniversary

या वेळी कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे हे प्रमुख पाहुणे असून अध्यक्षस्थानी श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजशेखर मलुष्टे उपस्थित राहणार आहेत. तसेच यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, ट्रस्टी श्रीमती सोनवीताई देसाई व बाळकृष्ण शेलार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष प्रा. बिना कळंबटे, कार्यवाहक नरेंद्र खानविलकर यांच्यासह श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाचे आजी-माजी छात्रमित्र उपस्थित राहणार आहेत. Balasaheb Kher Birth Anniversary

कै. बाळ गंगाधर खेर हे स्वातंत्र्य सेनानी, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, थोर मानवतावादी व पद्मविभूषण सन्मानाचे मानकरी होते. त्यांनी स्थापन केलेल्या सर्वोदय छात्रालयातून आजवर १६०० हून अधिक विद्यार्थी शिकून चांगल्या पदावर पोहोचले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व लातूर परिसरातील ग्रामीण भागातील गरीब, वंचित व धडपडणाऱ्या मुलांचे आश्रयस्थान म्हणून सर्वोदय छात्रालय कार्यरत आहे. चारित्र्यसंपन्न युवक घडविणे आणि स्त्रीशक्ती जागृत करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Balasaheb Kher Birth Anniversary

Tags: Balasaheb Kher Birth AnniversaryGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.