गुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी शिबिरास गुहागरच्या तहसिलदार श्रीम. प्रतिभा वराळे, वकील संकेत साळवी, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी उपस्थित होते. चाईल्ड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष दिवंगत एल. आर. चना यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करून प्रमुख उपस्थितांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पांजली वाहिली. यानंतर उन्हाळी सांगता शिबिरास सुरुवात झाली. Bal Bharti Public School Summer Camp concludes


सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी आपल्या भाषणातून शिबिरार्थींना संबोधित केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शिबिरातून मिळालेले अनुभव सांगताना मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी व शारीरिक शिक्षणाचे शिक्षक नविंदर लखनपाल यांचे धन्यवाद मानले. तहसिलदार वराळे यांनी शिबिरार्थींना खेळातून स्वयंशिस्त, टीमवर्क, आत्मविश्वास ही मूल्य रुजतात. म्हणून फक्त शिबिरापुरते न खेळता तुमच्या खेळाच्या सरावात सातत्य ठेवून स्वत:चा विकास करता करता खेळातून शाळेचेही नाव मोठे करा. त्याचबरोबर उन्हाळी शिबीरात कला, नृत्य व संगीत यांचीही शिबिरे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासताना शास्त्रीय मार्गदर्शन मिळाले. वकील संकेत साळवी यांनी शाळेबद्दल प्रशंसा व्यक्त केली. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतही खेळ, कला, नृत्य व संगीत यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. Bal Bharti Public School Summer Camp concludes
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सुमन लखनपाल यांनी केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक नविंदर लखनपाल, नृत्य शिक्षक प्रतिक मजुमदार, कला शिक्षक राहुल हेगीष्ट्ये, संगीत शिक्षक सुशील जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. Bal Bharti Public School Summer Camp concludes