मुख्य विद्यार्थी जयवर्धन जाधव तर विद्यार्थिनी कु. संस्कृती हळये
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीने मैत्री क्लब आरजीपीएल येथे विद्यार्थी पदभार समारंभ पार पडला. हा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. कार्यक्रमासाठी आरजीपीपीएल (RGPPL) व्यवस्थापक असीमकुमार सामंता, महमेद हक, श्री. एस.पी. रेड्डी, डॉ. जॉन फिलीप, श्रीम. लता जॉन, तहसिलदार श्रीम. प्रतिभा वराळे, श्रीम. अनुरूपा चटर्जी व पालक उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे फुलांचे रोपटे देऊन स्वागत केले. Bal Bharti Public School ceremony concluded

या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी आपल्या भाषणातून प्रमुख अतिथींचे आभार मानले. व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जबाबदारीबद्दल संबोधित केले. विद्यालयाचा मुख्य विद्यार्थी म्हणून कु. जयवर्धन जाधव आणि विद्यार्थिनी कु. संस्कृती हळये यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर विद्यालयाच्या वशिष्ठी हाऊसचे कप्तान कु.आदित्य बनिश व कु. श्रावणी बागकर, उपकप्तान कु. तनिष देवाळे व कु. आर्या कामेरकर, सावित्री हाऊसचे कप्तान कु. केतन आग्रे, कु. श्रावणी शेटे, उपकप्तान कु. मारुफ बांगी, कु.रुई वळंजू, गोदावरी हाऊसचे कप्तान कु.आर्य मोरे, कु. प्रिया वैष्णव, उपकप्तान कु. नील एम. एस. व कु. राही शिंदे, कृष्णा हाऊसचे कप्तान कु. विश्व भोसले व कु. तन्वी पारखे, उपकप्तान कु. आर्यन चव्हाण, कु.तनया खानविलकर, कल्चर सेक्रेटरी कु. अथर्व देसाई, कु.अपूर्वा खोत, स्पोर्ट कप्तान हर्षल कुमार भाले व खुशी वेल्हाळ यांची निवड करण्यात आली. तसेच प्रत्येक वर्गातील उत्तम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. Bal Bharti Public School ceremony concluded

तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे महत्त्व सांगितले. तसेच शाळा विविध उपक्रम राबवत आहे. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गतीने होतो. प्रत्येक मुलाने आपले ध्येय निश्चित करून सचोटी, कठोर परिश्रम आणि शिस्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. असीमकुमार सामंता यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वाची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी सर्वांसमवेत शपथ ग्रहण केली. Bal Bharti Public School ceremony concluded
