गुहागर, ता. 20 : शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील १०वी सी.बी.एस.ई बोर्डाच्या परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूल, आरजीपीपीएल, अंजनवेल, गुहागर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Bal Bharati Public School Result
प्रशालेत प्रथम कु. माही पराग शाह (९९ .२%) गुण, द्वितीय कु. ऋषिकेश दत्तात्रय सानप (९६.६%) गुण, तृतीय कु. नंदिता बाला (९५.६%) गुण तर कु. समृद्धी संतोष मोरे (९४.८%) गुण, कु. श्रेया संदीप पवार (९१%) गुण, कु. साची नवनीत फुलझेले (९०.८%), कु. अर्णव रामलिंग तोडकरी (९०.४%), तर कु. नेहा विकास पटेकर (९०.२%) या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून शाळेच्या यशाची परंपरा राखली. Bal Bharati Public School Result


कु. माही शाह व कु. नंदिता बाला या विद्यार्थिनींनी इंग्रजी विषयामध्ये १००% गुण, कु. माही शाह, कु. ऋषिकेश सानप, कु. समृद्धी मोरे व कु. अर्णव तोडकरी या विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये १००% गुण, कु. माही शाह हिला गणित व विज्ञान विषयामध्ये ९९% गुण, समाजशास्त्र विषयामध्ये ९८% गुण तर कु. नेहा पटेकर व कु. आयेशा खतीब या विद्यार्थींना माहिती तंत्रज्ञान विषयामध्ये ९८ % गुण मिळवून या विषयांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. Bal Bharati Public School Result


या विद्यार्थ्यांना श्री. जीजी पी ए , सौ. राणी थाﬞमस, श्री. मनोज जाधव, सौ. केना तिवारी, सौ. मालबिका भट्टाचारजी, सौ. जेनिफर जॉफरी व श्री. राजकुमार शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुरजित चटर्जी, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Bal Bharati Public School Result