• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देव तारी त्याला कोण मारी

by Guhagar News
October 8, 2024
in Ratnagiri
190 2
0
Baby was saved in Derwan hospital
374
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिमुकला २० दिवस बेशुद्ध; वालावलकर रुग्णालयातील डाँक्टरांच्या अथक प्रयत्नाने जीवदान

गुहागर, ता. 08 : नवीमुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाच्या गळ्याला मण्यार या विषारी सापाने मानेचा चावा घेतला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही थांबला, आणि त्याच्या हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली. Baby was saved in Derwan hospital

या बाळाला तातडीने चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बाळावर वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कृत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला. पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ. अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. अशा अनेक दिवसांपासून बाळाची प्रकृती गंभीर होत होती. Baby was saved in Derwan hospital

भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा दिसेना. शेवटी डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडली पण ‘देव तरी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला. दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत बाळ हात हलवू लागले आणि आपल्या आईलासुद्धा ओळखू लागले. जवळजवळ पाऊण महिना हे बाळ मृत्यू शय्येवर होते. Baby was saved in Derwan hospital

पण बाळाला व्हेंटिलेटर असताना इन्फेकशन होऊ, नये पाठीला जखमा होऊ नयेत याची पूर्ण जबाबदारी बालरोग तज्ज्ञांनी समर्थपणे पेलली‌. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला. बाळाच्या आई वडिलांनी रुग्णालयाचे शतशः आभार मानले आहेत. रुग्णालयातील बालरोल विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला याबद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. Baby was saved in Derwan hospital

Tags: Baby was saved in Derwan hospitalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.