ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील खोडदे गिरवणे वाडी येथे श्री.राजेंद्र सिताराम साळवी यांची मुलगी सौ.धनश्री काताळकर हिने तीन बालकांना जन्म दिला. नुकताच या बालकांचा नामकरण सोहळा मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. Baby naming ceremony at Khodade

या तिळ्या (दोन मुली, एक मुलगा) नूतन बालकांचे नामकरण विधी कार्यक्रमानिमित्त निर्मल ग्रामपंचायत खोडदे आणि ग्रामस्थांच्या वतीने आजोबा श्री.राजेंद्र साळवी, आजी सौ.आरती साळवी मुलांचे आई वडील सौ.धनश्री काताळकर व श्री. कपिल काताळकर यांचा शाळ, श्रीफळ व शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. व नूतन बालकांस (कु.अथांग, श्रीजा, शार्वी) यांना शुभ आशिर्वाद देण्यात आले. Baby naming ceremony at Khodade

यावेळी सर्व मान्यवरांचे साळवी कुटुंबाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी खोडदे सरपंच श्री. लवेश पवार, उपसरपंच कु. पुजा गुरव, सामाजिक कार्यकर्ते श्री.विलास गुरव, शरद साळवी, शाहू पवार, विनायक गुरव, राजेश पवार ग्रामपंचायत सदस्य श्री.नाना साळवी, श्री.रवींद्र निवाते, श्री.विलास निर्मल, सौ.तनुजा पवार, श्री. शुभांगी डिंगणकर, राजा पवार, सुनील पवार, संतोष चव्हाण, सुमित पवार, विनायक पवार, राहुल पवार, शांताराम पागडे, साहील पवार, राजेंद्र कताळकर, सौ.राजेश्री काताळकर, नितीन मोहिते, प्रकाश साळवी, जितेंद्र साळवी, विकास साळवी परिवार मित्रमंडळी उपस्थित होते. Baby naming ceremony at Khodade

