जनकल्याणकारी योजनेची जनजागृती व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे डॉ. नातू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
गुहागर, ता. 17 : ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांचा आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्तुत्य आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात हे आश्वासन दिले होते आता त्यांनी ते आश्वासन पाळले आहे. या योजनेंतंगत देशातील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत सा वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहे. या जनकल्याणकारी योजनेची जनजागृती व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन डॉ. नातू यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. Ayushman Yojana will be a boon for the seniors

डॉ. नातू म्हणाले, केंद्रीय स्वास्थ्य मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही योजना तातडीने लागू करण्यात येईल, अशी घोषणा केलेली आहे. सरकारने यासाठी १७०६२ शासकीय रुग्णालये आणि खासगी क्षेत्रातील १३४० रुग्णालयांचा समावेश केलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही स्वास्थ्य योजना किंवा आयुष्मान भारत PM-JAY सीजीएचएस, ईएसआयएस या योजनांमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या सर्व नागरिकांना जुन्या योजना किंवा आयुष्मान भारत जनआरोग्य योजना निवडण्याचा पर्यात देण्यात आला आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेसाठी ३,४३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यो योजनेत सहभागी होण्यासाठी लोकांना त्यांच्या नावाची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेत जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेमध्ये ७.३७ कोटी रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. Ayushman Yojana will be a boon for the seniors
या योजनेचा ४९ टक्के महिलांना लाभ मिळणार आहे. देशातील रुग्णालयामध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १२ टक्के लोक दाखल होत असतात. या वर्षाच्या प्रारंभीत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत या लोकांना उपचारासाठी रक्कम दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने हृदयरोगाचे रुग्ण असतात. यानंतर शस्त्रक्रिया आणि अस्थि रोगाचे रुग्ण असतात. देशातील राज्य सरकारे या योजनेसाठी ४० टक्के खर्च करणार आहेत. पहाडी राज्ये आणि पूर्वोत्तरची राज्ये या योजनेवर ९० टक्के खर्च करणार आहेत. Ayushman Yojana will be a boon for the seniors
२०११ च्या जनगणनेमध्ये देशात ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या ८.६ टक्के होती. ती संख्या २०५० पर्यंत १९.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ज्येष्ठांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वयाच्या लोकांकरिता सीजीएचएस, ईएसआयएस, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना, ऑपरेटिव्ह हेल्थ इन्शुरन्स इत्यादी योजना लागू असतात. अशा योजनेबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. नातू यांनी व्यक्त केले आहे. Ayushman Yojana will be a boon for the seniors