गुहागर, ता.13 : तालुका आरोग्य विभाग गुहागर यांच्या वतीने आयुष्यमान भवं मोहीमेचे तालुकास्तरीय उदघाट्न गुहागर पंचायत समिती येथे बुधवारी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवयव दान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच टीबी मुक्त भारत करणाऱ्या निक्षय मित्र यांचा गौरव करण्यात आला. Ayushman Bhav campaign launched in Guhagar

यावेळी गटविकास अधिकारी श्री. प्रमोद केळस्कर, तालुका आरोग्य अधिकारी श्री. डॉ.गावड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री. डॉ. बळवंत, आपला दवाखाना गुहागरचे श्री. डॉ. लाटकर, आरोग्य पर्यवेक्षिका श्रीम. सातपुते, आरोग्य सहाय्यक श्री. भालेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. चप्पलवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. वैभव कदम, आरोग्य सेवक श्री. सागर मोरे, श्री. सचिन चौगुले, श्री. अक्षय गावडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचलन श्री. किरण शिंदे यांनी केले. Ayushman Bhav campaign launched in Guhagar

