• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयुषमान भारत योजनेत लाखांहून अधिक आरोग्य केंद्रे

by Manoj Bavdhankar
July 7, 2022
in Bharat
16 0
1
Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली, ता. 7 : आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात (HFR) झाली आहे.  हा ऐतिहासिक मैलाचा दगड गाठल्यामुळे, डिजिटल आरोग्य मंचाचा अधिक व्यापक स्वीकार आणि सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Ayushman Bharat Yojana

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे राबवली जाणारी एबीडीएम ही सरकारची प्रमुख योजना आहे. आरोग्य नोंदणी अभिलेखागार हा देशभरातील आधुनिकपासून ते पारंपरिक औषध प्रणालीपर्यंतचा आरोग्य सुविधांचा  एबीडीएमअंतर्गत उभारण्यात आलेला सर्वसमावेशक कोष आहे. त्यात सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही सुविधांचा समावेश असून रूग्णालये, क्लिनिक्स, रोगनिदानात्मक प्रयोगशाळा आणि स्कॅनिंग केंद्रांचा अंतर्भाव आहे. Ayushman Bharat Yojana

डिजिटल आरोग्य सुविधा परिसंस्थेत संगणकाच्या सहाय्याने माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा (इंटरऑपरेटिबिलिटी) शक्य होईल, अशा पद्धतीने निरंतर ऑनलाईन मंच तयार करण्याचा एबीडीएमचा उद्देश  आहे. आरोग्य केंद्रे, रूग्ण आणि आरोग्यसुविधा व्यावसायिक अशा सर्व भागधारकांसाठी निरंतर आरोग्य सुविधेचा अनुभव देण्याच्या दृष्टीने, एबीडीएमने प्राथमिक युनिट आणि आंतरसंचालित अप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस(एपीआय) विकसित केले आहेत. यापैकी एक प्रमुख प्राथमिक युनिट आरोग्य सुविधा नोंदणी हे आहे. Ayushman Bharat Yojana

आरोग्य सुविधा नोंदणीचे महत्व स्पष्ट करून सांगताना आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर एस शर्मा म्हणाले की, देशातील नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सुविधा केंद्रांची रूग्णांना सहजतेने विस्तृत माहिती मिळेल, यासाठी विश्वासार्ह राष्ट्रीय मंच तयार करणे हा आमचा उद्देश  आहे. राष्ट्रीय  अभिलेखागारात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य केंद्रांनी, जे आता या कोषाचे भाग बनले आहेत,  घेतलेला उत्साहपूर्वक सहभाग आम्ही पाहिला आहे. देशातील अलोपथी,  आयुर्वेद,  दंतचिकित्सा,  होमिओपथी,  फिजीओथेरपी, युनानी, सिदध किंवा सोवा रिग्पा या विविध औषधांच्या पद्धतींसाठीच्या नोंदणीकृत आरोग्य सुविधा केंद्रांचा शोध  रूग्ण एबीडीएम नेटवर्कच्या माध्यमातून  सहज घेऊ शकतील. त्याचप्रमाणे, डॉक्टर्स,  परिचारिका आणि निमवैद्यकीय  व्यावसायिक यांच्यासाठी रूग्ण आणि आरोग्य सुविधा व्यावसायिकांचे एबीएचए क्रमांक आमच्याकडे आहेत. या अभिलेखागारामुळे सर्वांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा सहज मिळेल.  Ayushman Bharat Yojana

आरोग्य अभिलेखागारासाठी नोंदणी केल्यावर एका विश्वासार्ह राष्ट्रीय मंचावर आरोग्य केंद्रांची सूची तयार करणे शक्य होईल आणि भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी एबीडीएमच्या सॉफ्टवेअर सोल्युशन्सच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांना सक्षम करेल. लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या  एकत्रित आरोग्य इंटरफेसच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांसाठी नागरिक करत  असलेल्या शोधात सुधारणा होणार आहे. आरोग्य केंद्रांची नोंदणी https://facility.abdm.gov.in/ किंवा आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांसारख्या संकलकाच्या  माध्यमातून नोंदणी करता येईल. Ayushman Bharat Yojana

पडताळणी केलेल्या आरोग्य केंद्रांपैकी 97 टक्के केंद्रे ही सरकारी क्षेत्रातील आहेत. सत्यापित केंद्रांपैकी सर्वोच्च संख्येने केंद्रे ही उत्तरप्रदेश,  आंध्रप्रदेश,  महाराष्ट्र,  बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि आसामात आहेत. एचएफआर अंतर्गत स्वामित्वहक्कावर आधारित (सार्वजनिक किंवा खासगी), सत्यापित आणि नोंदणीकृत आरोग्य केंद्रांचा तपशील औषधांची प्रणाली आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय कामगिरी एबीडीएमच्या सार्वजनिक कळफलकावर  https://dashboard.abdm.gov.in/abdm/  वर आहे. या कळफलकावर राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीकोषाची  दैनंदिन, मासिक आणि एकत्रित प्रगतीचे कल तक्त्यातून दाखवले जातात. Ayushman Bharat Yojana

नोंदणी अभिलेखागारातील प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक विशिष्ट ओळखकर्ता असून एबडीएम परिसंस्थेत प्रतिचित्रणासाठी  त्याचा उपयोग केला जातो. तसेच देशातील सर्व सार्वजनिक आणि खासगी आरोग्य केंद्रांची सर्वसमावेशक माहिती पुरवली जाते. हा एकमेव ओळखकर्ता इतर संस्थांकडूनही (परवानगीने) एबीडीएम सॉफ्टवेअर सोल्युशन्ससारख्या सुविधांचा वापर करून केंद्र निश्चित करून आवश्यक सुविधा केंद्राची माहिती आवश्यक उद्दिष्टांसाठी परत मिळवून वापर करू शकतो. Ayushman Bharat Yojana

Tags: Ayushman Bharat YojanaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.