गुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे नुकतेच आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना देवस्थान मार्फत 10 दिवसांची औषधे मोफत देण्यात आली. Ayurvedic Medical Camp in Guhagar

श्री देव व्याडेश्वर देवस्थानने श्रावण महिन्यातील दर सोमवारी तालुकावासियांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून वाताचे विकार, त्वचारोग आणि पचनाचे विकार यावर आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्य समीर परांजपे, दापोली, वैद्य अतीन औताडे, चिपळूण, वैद्य अमेय भावे, चिपळूण यांनी दिवसाभरात सुमारे 80 रुग्णांना तपासले. आयुर्वेदिक चिकित्सेने सर्व रोग पुर्ण बरे होऊ शकतात. या चिकित्सा बद्दतीत शरीरावर अन्य कोणतेही परिणाम होत नाही. असा विश्वास वैद्यांनी रुग्णांना दिला. तसेच देवस्थांच्या सहाय्याने रुग्णांना आवश्यक असलेली 10 दिवसांची आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात आली. Ayurvedic Medical Camp in Guhagar

आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरासाठी आलेल्या वैद्य समीर परांजपे, दापोली, वैद्य अतीन औताडे, चिपळूण, वैद्य अमेय भावे, चिपळूण यांचे व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे व संचालक केदार खरे व प्रथमेश दामले यांनी श्री देव व्याडेश्वरचा प्रसाद दिला. व त्यांचा सत्कार केला. Ayurvedic Medical Camp in Guhagar
