गुहागर, ता.11 : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्र व काजूर्ली ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने ‘हर घर झेंडा’ जनजागृती प्रभात फेरी काजूर्ली मानवाडी येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली. मुसळधार पाऊस असूनही लहान मुलांपासून ते वयोवृद्ध ग्रामस्थ या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. Awareness round at Bhatgaon
भारतीय स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या मनातमनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती कायम राहाव्यात, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान हाती घेतले आहे. संपूर्ण भारतभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनजागृतीसाठी भातगाव केंद्र व काजूर्ली ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. केळसकर यांच्या प्रमुख उपस्थिती जनजागृती प्रभात फेरी काजूर्ली गावातून काढण्यात आली. Awareness round at Bhatgaon


यावेळी काजूर्ली गावाचे सरपंच श्रीम रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे, भातगाव कोसबीचे सरपंच सौ. अर्चना वेले, उपसरपंच मुलू सुवरे, भातगाव गोळेवाडीचे सरपंच सौ. रेणुका आग्रे व मान्यवर उपस्थित होते.’घरोघरी उभारूया अभिमानाने तिरंगा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त | चला फडकवू घराघरात तिरंगा ||’,’चला लागूया देशप्रेमाच्या, देश भक्तीच्या कार्यास | तेरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत फडकवू तिरंगा ||’अशा घोषणा व देशभक्तीपर गीतांनी परिसर दणाणून टाकला. या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी बाई, आशा सेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. Awareness round at Bhatgaon
प्रत्येक मुलांच्या हातात तिरंगा झेंडा, घोषणा फलक होते. ढोल ताशे यांच्या गगन भेदून जाणाऱ्या आवाजाने गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. या प्रभातफेरीचा शेवट काजूर्ली नंबर दोन या शाळेत सभेच्या रुपात झाला. या सभेत गटविकास अधिकारी यांनी तिरंगा ध्वज फडकविण्या संदर्भात नियमाविषयी नागरिकांना माहिती दिली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री कासारे, भातगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक दशरथ साळवी, श्री पांचाळ, ग्रामसेवक श्री. गोरे उपस्थित होते. Awareness round at Bhatgaon


या मोहिमेच्या प्रचार प्रसारासाठी शाळा शाळांतून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये केंद्र स्तरावर क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काजूर्ली हायस्कूल, काजूर्ली नंबर एक, भातगाव गोळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीते गायली. या प्रभातफेरीत काजूर्ली ग्रामपंचायतीने अल्पपोहार व प्रत्येक विद्यार्थ्यांला झेंडा देण्याची व्यवस्था केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भातगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांचे योगदान लाभले. Awareness round at Bhatgaon