गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २. या शाळेने जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या सूचनेनुसार गावात प्रभात फेरी काढली. यावेळी गावात प्रभात फेरी काढताना जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. Awareness Ferry in School Varveli No 2

वाडीतील प्रत्येक घरी जाऊन ग्रामस्थांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची माहिती यावेळी देण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी हर घर तिरंगा या उपक्रमास साजरा करू असे सांगितले. हातात विविध घोषणा पत्र घेऊन मुले घोषणा देत होती. कोणतेही ध्वजारोहण नसताना मुले का घोषणा देत आहेत. याकडे कुतूहलाने ग्रामस्थ घराबाहेर पडून पाहत होते. Awareness Ferry in School Varveli No 2

शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक जावरे यांनी ग्रामस्थांना हर घर तिरंगा या विषयी माहिती देत होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अरुण भुवड, माता पालक, शिक्षक पालक, बहुसंख्य पालक व सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी मधील छोटी बालकांनी उत्साहाने उपस्थित झाले होते. हा कार्यक्रम संपल्यावर मुले शाळेत आल्यानंतर त्यांना पोषण आहार वाटप करून फेरीची सांगता करण्यात आली. Awareness Ferry in School Varveli No 2
